सह्याद्रीपुत्र यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला.
महाराष्ट्राला लाभलेल्या थोर पुरुषांपैकी एक म्हणजे श्री यशवंतराव चव्हाण. स्वातंत्र्य चळवळीपासून ते स्वातंत्र्योत्तर भारताचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री अशी त्यांची चढत्या क्रमाने वाटचाल झाली. त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि लोकप्रियतेचा प्रत्यय आणून दिला. गरीबतल्या गरीब तळातील लोकांना विकासाची चाखता यावीत अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या राजकीय व सामाजिक सावधगिरीचा, त्यांच्या शांत संयमी व खंबीर नेतृत्वाचा लाभ केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आदर, आत्मीयता, प्रतिष्ठा होती.
स्वातंत्र्यापूर्वी चळवळीत काम करत असताना यशवंतरावांच्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांपैकी एक घटना म्हणजे...
स्वातंत्र्यपूर्व काळात १९३० साली चळवळीचा एक भाग म्हणून लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव संमत झाला. त्यादिवशी २६ जानेवारीला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आदेश काँग्रेसने दिले होते. १९३० सालची २६ जानेवारी जवळ येत चालली होती. कराडमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा कसा करायचा याचा काही तरुण मंडळी विचार करीत होते. यशवंतराव चव्हाण त्यावेळी शाळकरी विद्यार्थी होते. पण काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला लोटून दिले होते. समविचारी युवकात रंगून गेले होते. ही मित्रमंडळी कराडमधल्या एका छोट्या छापखाण्यात जमली होती. २६ जानेवारीचाच विचार सर्वांच्या डोक्यात होता. "स्वातंत्र्याची हाक देणारे एक बुलेटिन तयार करून, शाळेतून व चौकाचौकातून वाटावे अशी कल्पना पुढे आली आणि लगेच संमत ही झाली.
यशवंतराव त्यावेळी छोटेसे लेखक होते. शाळेतील निबंध सुविचार वैगेरे ते बऱ्यापैकी लिहीत असतं. तेव्हा काही लिहिण्याचा प्रसंग आलाच त्यांचे सहकारी ते काम त्यांच्यावर टाकीत. त्या रात्री त्यांनी लिहिलेली "स्वातंत्र्याची हाक" ही बुलेटिन त्या दिवशी संपूर्ण कराडच्या चौकाचौकातून, घराघरातून, शाळेतील विद्यार्थ्यांना वाटली.
यशवंतराव यांनी लिहिलेल्या या "स्वातंत्र्याची हाक" या लेखाचा आशय असा होता की... 'महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या लढाईतील आम्ही सैनिक आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पडेल तो त्याग करावयास आम्ही सिद्ध आहोत. प्रसंगी आमचे प्राणही आम्ही अर्पण करणार आहोत."
असा तो प्रतिज्ञालेखच होता. अगदी तेव्हाच्या तारुण्यसुलभ उत्कट भावनेला शोभणारा.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही मरणोत्तर क्रांतीची ज्योत सतत तेवत ठेवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सह्याद्रीपुत्र श्री. यशवंतराव चव्हाण यांना मानाचा मुजरा...!!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻