अगरबत्ती | असेही काही... कहाणी शब्दांची... गंमत अक्षरांची | Mystery Of Word Insence stick

अगरबत्ती... उदबत्ती !!

 मंद समईच्या प्रकाशात 

देव हसतो गं गाभार्‍यात 

उदबत्ती धूपाच्या गंधाने 

भक्तजनांचा ठेवतो गं हृदयात...!

पहाटे मंदिरात पूजा केली जाते. समईच्या  मंद ज्योत तेवत असते आणि तिच्या सोबतीला पूर्ण गाभारा गंधाळून टाकणारी अगरबत्ती किंवा उदबत्ती असते जिच्याशिवाय आपली कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. तिचा सुगंध आपणांस वेडावून टाकतो. मित्रांनो अगरबत्ती उदबत्ती चा जन्म झाला कसा हे आपणास ठाऊक आहे का? नाही ना आपण विचारच करत नाही.

चला तर आपण याविषयी जाणून घेऊया मित्रांनो अगर हा एक मोठा वृक्ष आहे. भारताच्या ईशान्य भागात हा वृक्ष आढळतो. ईशान्येकडे म्हणजेच आसाम नागालँड , मिझोराम, त्रिपुरा, गोरो, खासिया, काचार, सिल्हेट येथील जंगलात हा वृक्ष आढळतो. हा वृक्ष आपल्या त्रिपुरा राज्याचा राजवृक्ष आहे. मित्रांनो यातील गंमत अशी की या वृक्षाच्या खोडाला लागलेल्या बुरशीपासून हे खोड काळे होते आणि ते उपयुक्तांग आहे म्हणजेच उपयुक्त आहे.  हे खोड पाण्यात बुडते देखील  आणि या वृक्षाच्या बुरशी आलेल्या खोडापासून सुगंधी द्रव्य बनवले जाते. हे सुगंधी तेल अगरबत्तीचा मुख्य घटक असतो. काही वेळा या झाडाच्या खोडाच्या ढपलीतून तेल काढून घेतले जाते आणि नंतर त्याच्या अगरबत्तीचा काडी बनवण्यासाठी उपयोग केला जातो. हे सुगंधी तेल अगरबत्तीचा मुख्य घटक असतो.

संस्कृत मधील अगरु  हिंदीत आणि बंगालीत अगर हा शब्द झाला तर पंजाबी  शब्दाला ऊद हा शब्द आला आणि त्याचबरोबर आणि ह्या ऊदला पेटविणे म्हणजेच बत्ती. दोन शब्द मिळून उदबत्ती तसेच अगर + बत्ती  हा शब्द मिळून झाला अगरबत्ती मजा आहे की नाही. हे दोन शब्दांची उत्पत्ती ऊदबत्तीआणि अगरबत्ती दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे नाहीत परंतु अक्षरांच्या आणि शब्दांच्या एक गमंतीतून हा शब्द जन्माला अगरबत्ती आणि उदबत्ती.

आयुर्वेदात या आगराच्या लाकडाचा काढा वापरला जातो. तसेच मुस्लीम देशात त्याला खूप मागणी आहे. असे म्हणतात की अँडम आणि इव्हने हा वृक्ष स्वर्गातून पृथ्वीवर आणला अशी कथा सांगितली जाते. तर आपल्या माऊलींनी म्हणजेच ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायामध्ये असे लिहितातकी कर्पूर चंदन अगरू ऐसे याचा सुगंधाचा महामेरू. पूर्वीपासून हे उदबत्ती अगरबत्ती धूप आपण वापरत आलेलो आहोत आणि आज आपण त्या उदबत्ती चा जन्म कसा झाला हे आपण पाहिलेले आहोत लवकरच पुढचा एक शब्द घेऊन आपल्यासमोर येणार आहे.

वाचत राहा... ऐकत रहा...

कहाणी शब्दांची... गंमत अक्षरांची !!

🌿आस

लेख Audio स्वरूपात ऐका

व डाऊनलोड करा

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

أحدث أقدم