शाहू महाराज परिचय
महाराष्ट्राने देशाला अनेक विचारवंत दिले. आंबेडकरांपासून तर कर्मवीरांपर्यंत या सर्वांची सामाजिक आणी वैचारिक जडणघडणीचे श्रेय मात्र शाहू महारांकडे जातं. शिवाजी महाराजांनतर खरा समाजवाद आणी समतेची शिकवण देणारे शाहू महाराज हे लोकोत्तर पुरूष होते. समाजातील तळागाळातील लोकांना त्यांचा आधार वाटायचा. भारतात पहिल्यांदा सर्व समाजाच्या मुलांना शिक्षणाची आणी वसतिगृहाची सोय करून देणारे ते युगपुरूष होते. मुलीच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहान दिले.
ते कर्ते सुधारक होते आपल्या राज्यातील फासेपारधी,मातंग, गारुडी यांना त्यांनी आपल्या दरबारात नोकर्या दिल्या एवढे करून ते थांबले नाही तर अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले.
एकदा पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधून त्याच्या अनावरणासाठी ब्रिटनचा सम्राट प्रिन्स ऑफ वेल्सला निमंत्रित करून पुण्यात आणले व महाराजांच्या पुतळ्याला सम्राटाला मुजरा करण्यास भाग पाडले असा हा पराक्रमी आणी मत्सुद्दी राजा होता.
त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. एकदा त्यांनी इंदूरला धनगर मराठा विवाह घडवून आपली उक्ती आणी कृती एकच आहे हे समाजाला दाखवून दिले. ते कलासक्त होते आपल्या राज्यातील कलाकारांना ते राजाश्रय देत. एकदा नाटक पहातांना शिवाजी महारांजांच्या भूमीका करणार्या तरूणांना त्यांनी लवून मुजरा केला ते कुस्त्यांचे च्याहते होते आजही कोल्हापूरात उत्तम मल्ल तयार होतात ती महाराजांनी दिलेली देणगी आहे.
राज्यातील शेतकरी शेतमजूरांची ते काळजी घेत . शेतकर्यासाठी त्यांनी त्या काळात राधानगरी धरण बांधून शेतीविकासाला चालना दिली. शेतमाल खरेदी विक्रीसाठी त्यांनी मार्केट यार्ड तयार करून कोल्हापूरात एक बाजारपेठ निर्मान केली. त्यांनी विधवेच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहान दिले महार व कुलकर्ण्यांची वतने रद्द केली सक्तीचे प्राथमीक शिक्षण देणारा हा पहिला राजा भारतातील राजा होता आजही महारांच्या कार्याचा अलौकीक ठसा आपणास कोल्हापूर परिसरात दिसून येतो. महाराज हे रयतेचे राजे होते. छत्रपतींचे वारसदार होते. एकदा वनात गेलेले असतांना अस्वल त्यांच्या अंगावर आले असतांना त्यांनी त्याचा सक्षमपने मुकाबला केला होते.
एकदा व्हाईसरायने संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठी देशातील सर्व संस्थानिकांना निमंत्रीत केले होते. त्यामध्ये महाराज आपल्या शरीरयष्टीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचासारखा पराक्रमी प्रजेचे हीत पहाणारा साहित्य कला संस्कृतीची पाठराखण करणारा. समाजवादी समाजरचनेचा स्विकार करणारा राजा होणे नाही. शेतकरी, कारागीर, कलाकार, विद्यार्थी, गोर गरीब यांची ते काळजी घेत शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मविर भाउराव पाटलांच्या विचारांवर चालण्याचा संदेश देऊन दि. 6 मे 1922रोजी त्यांच निधन झाले त्यांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक