गणेशाचा आवडता मोदक व त्याचे वाहन उंदीर | गणेशोत्सव माहिती | Ganeshotsav Festival | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

शिवमानस पूजेत गणेश हा ॐ कार प्रणव आहे. ॐ कार म्हणजे एकाक्षर ब्रह्म. या अक्षराचा वरचा भाग हे गणेशाचे मस्तक आहे, खालचा भाग म्हणजे उदर आहे, चंद्रबिदू म्हणजे लाडू आहे तर मात्रा म्हणजे सोंड आहे. गणेशाचे वाहन उंदीर आहे. त्यामागेही एक कथा आहे. प्राचीन काळी महामेरू पर्वतावर सौभरी ऋषी त्यांच्या अतिशय सुंदर पत्नीसोबत राहात होते. ते बाहेर गेले असताना कौंच नावाच्या एका गंधर्वाने ऋषीपत्नीचा हात धरला तेवढ्यात ऋषी परतले व त्यांनी गंधर्वाला उंदीर होशील असा शाप दिला. त्याने ऋषींची क्षमा मागितली तेव्हा उःशाप देताना ऋषींनी सांगितले की द्वापार युगात महर्षि पराशर गणपती म्हणून प्रकट होतील तेव्हा तू त्याचे वाहन म्हणून राहशील.

🚩 संपूर्ण गणेशोत्सव माहिती

गणपतीला मोदक आवडतात. मोद म्हणजे आनंद व क म्हणजे छोटा भाग मोदक म्हणजे आनंदाचा छोटा भाग. त्याचा आकार नारळासारखा आहे. म्हणजेच हा आकार ख या ब्रह्मरंध्रासारखा आहे. कुंडलीनी ख पर्यंत पाहोचली की आनंदाची अनुभूती येते. गणेशाच्या हातातला मोदक त्याची आनंद देण्याची शक्ती दर्शवितो.

🚩 मराठी आरती संग्रह

गणपतीची सोंड डावीकडे की उजवीकडे यावरूनही अनेक वाद आहेत. सोंड ही दुष्टशक्तींना पळवून लावणारी आहे. सुख समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर उजव्या सोंडेचा गणपती पुजावा असे सांगितले जाते. मात्र या गणपतीचे सोवळे फार कडक असते. शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर डाव्या सोंडेचा गणपती पुजावा. गणपतीचे कान खूपच मोठे आहेत. त्याचा असा अर्थ आहे की जे जे कानावर पडेल ते सारे ऐकून घ्या मात्र कृती करताना मनाचा निर्णय घ्या. गणेशाचे छोटे डोळे हे सूक्ष्म तीक्ष्ण दृष्टीचे प्रतीक आहेत. गणेशाचा एक दात अखंड आहे तर दुसरा तुटका आहे. अखंड दात हे श्रद्देचे प्रतीक आहे तर तुटका दात बुद्धीचे प्रतीक आहे. याचा अर्थ असाही आहे की बुद्धी भ्रमित झाली तरी श्रद्धा ढळता कामा नये.

लेखन : शामला देशपांडे

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक

------------------------------
इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

------------------------------

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

------------------------------

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

أحدث أقدم