नरक चतुर्दशी 1
नरक चतुर्दशी 2
नरक चतुर्दशी : कथा व स्नानाचे महत्व
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. नरक चतुर्दशी हा नरक चतुर्दशीच्या दिवसांतील एक आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.
आख्यायिका :
नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचावध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच - कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्वव मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.
नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची (पणती लावण्याची ) प्रथा आहे असे मानले जाते. वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेवून त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.
कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. यादिवशी लोक घरांची साफसफाई करतात. शारीरीक स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. सूर्यादयापूर्वी उठून तेल- उटणे लावून स्नान केले पाहिजे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते.
पौराणिक महत्त्व :
या दिवशी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.
विशेष अभ्यंगस्नान कसे करावे?
चंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा...
यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये ।
या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा...
दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया ।
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।
संध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा.
अभ्यंगस्नान का करतात व त्याचे महत्व :
दिवाळी पूर्वी अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पौराणिक संदर्भांच्या आधारे ग्रामीण संस्कृतीत नरक चतुर्दशीला आजही विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई व सूर्योदयापूर्वी अंगाला उटणे आणि तेल लावून स्नान केले जाते.
ग्रामीण भागात आजही शेणामातीने सारवलेल्या रांगोळ्यांनी सजलेल्या अंगणात या दिवशी सूर्याचे पहिले किरण पडावे, सूर्यप्रकाशाप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे, वाईट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा, यासाठी ग्रामीण भागात पहाटे गाईच्या शेणाने सडा, सारवण केले जाते. मानसिक स्वच्छतेबरोबर शारीरिक आणि परिसराची साफसफाईदेखील या दिवशी केली जाते. गायीचा गोठा शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात.
कोणत्याही अस्मानी संकटात शेती व्यवसाय धोक्यात येऊ नये, पिकाचे नुकसान होऊ नये. पशुधन सुरक्षित निरोगी राहावे, यासाठी धरणीमाता आणि गोमातेची प्रार्थनाही केली जाते. शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवशी धान्याचीही पूजा करतात. अनेकजण सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करतात.त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा पेटवला जातो. या वेळी पूर्वेकडे तोंड करून अक्षता, फुलांनी पूजा केली जाते.
!! दीपावली शुभचिंतन !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक