शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग,
पुणे ४११०३०.
Email : arts.sportsdept@maa.ac.in
जा. क्र. : मराशैसंप्रप/कला क्रीडा / AKAM /२०२३/३७८८
दि. ११ ऑगस्ट २०२३
विषय : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.
संदर्भ : १. F. ११०३३६/०१/२०२३/KVS (HQ) /Acad / C-२०५१२ / AKAM DI. १०/०८/२०२३ २. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. १०/०८/२०२३
उपरोक्त विषयान्वये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.
त्याचप्रमाणे याही वर्षी म्हणजेच दि. १३/०८/२०२३ ते दि. १५/०८/२०२३ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे.
सदर उपक्रमाचे उद्देश स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाने गाठलेले प्रगतीचे टप्पे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे, आणि भारत देश घडविणाऱ्या महान व्यक्तींची आठवण करणे असे आहेत.
सबब त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत प्राचार्यानी सूचित करावे.
तसेच जिल्ह्यातील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल विभागाने यापूर्वी दिलेल्या https://forms.gle/mTRqVQCrPUq3ixw या लिंकवर सादर करावा.
रमाकांत काठमोरे
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे.
🇮🇳 स्वातंत्र्य दिन मराठी सूत्रसंचलन
🇮🇳 स्वातंत्र्य दिन हिंदी सूत्रसंचलन
🇮🇳 स्वातंत्र्य दिन इंग्रजी सूत्रसंचलन
🇮🇳 स्वातंत्र्य दिन मराठी प्रास्ताविक
🇮🇳 स्वातंत्र्य दिन हिंदी प्रास्ताविक
🇮🇳 स्वातंत्र्य दिन इंग्रजी प्रास्ताविक
🇮🇳 हर घर तिरंगा ध्वजारोहण नियमावली
🇮🇳 हर घर तिरंगा अभियान शा. निर्णय
----------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
----------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
----------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻