हर्निया म्हणजे काय ?

हर्नियाला मराठीत 'आंतरगळअसे म्हणतात. यात आतड्याचा काही भाग हा पोटाच्या स्नायूंमधून निसटतोबाहेर येतो. स्नायूतून पुढे आल्याने पोटावर मध्यरेषेतबेंबीजवळ हर्नियाचा फुगवटा दिसतो. क्वचित पोटाच्या कुठल्याही शस्त्रक्रियेनंतर त्या भागातील पोटावरचे स्नायू कमकुवत होऊन तिथे आंतरगळ होऊ शकतो.

जांघेत होणारा हर्निया अधिक आढळतो. कधीकधी मुलांमध्ये अंडकोषामध्ये हर्निया होतो. जेव्हा आतड्याचा भाग जांघेतून खाली उतरतोत्याने आलेला जो फुगवटा आलेला असतो तो खोकल्यानेशिंकल्यानेवजन उचलल्याने वाढतो. कारण या सर्व क्रियेत पोटावर दाब येत असतो. फुगवटा आत ढकललातर कमी होतो.

या आजारावर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे. हर्निया झाल्यावर लगेच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. हर्निया कधीकधी तसाच बाहेर राहून अडकतो. अशा वेळेस तो भाग दुखरा होतो. तापमळमळउलट्या अशी धोकादायक लक्षणे निर्माण होऊ शकतात. म्हणून हर्नियाचे ऑपरेशनच करून घेणे चांगले होय.

साभार : डॉ. अंजली दिक्षीत  डॉजगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून... 

أحدث أقدم