मिरगी वा फेफरे का होते?

निरोगी माणसाला अचानक झटका येणेक्वचित बेशुद्धी येणेहा मिरगी वा फेफऱ्याचा परिणाम असतो. फेफरे अनेक प्रकारचे असते. एखाद्या अवयवापुरता झटका येण्यापासून सर्व शरीराला आकडी येणेबेशुद्ध पड़णे असे अनेक प्रकार दिसून येतात. यालाच इंग्रजीत 'एपीलेप्सीअसे म्हणतात. अँड माल वा मोठे फेफरे या प्रकारात सर्व शरीराला झटका येतोतोंडाला फेस येतोशुद्ध हरपते व तेवढ्यापुरती स्मरणशक्ती जाते. काही प्रकारच्या फेफर्‍यात काही काळ शुद्ध हरपतेझटके येत नाहीत. पेटीट माल वा लहान फेफरे या प्रकारात स्मरणशक्ती शाबून राहतेशुद्धही हरपत नाही. फक्त एखाद्या भागापुरताच झटका येतो.

मेंदूतल्या विशिष्ट भागातील विद्युतप्रवाहामध्ये अचानक विघाड झाल्यास फेफरे होतेहे वैद्यकशास्त्राला ज्ञात आहे. पण ते का होतेते मात्र खात्रीने सांगता येत नाही. मिरगीच्या कारणात अनुवंशिकताजन्माच्या वेळी डोक्याला झालेली इजामेंदूतील वा डोक्यातील गाठरक्तप्रवाहात बिघाड इत्यादींचा समावेश होतो. खूप तापातमधुमेहासारख्या रोगात व रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झालेतरीही झटके येतातपण मिरगीचे झटके बऱ्याच वेळा येतात. तसेच त्यासोबत वर सांगितलेले (मधुमेह बगैरे) आजार असतील असे नाही. मिरगीचे निदान व उपचार तज्ज्ञांकडूनच करून घ्यावे. गार्डीनलडायलॅटीनटेग्रेटॉल यांसारख्या परिणामकारक औषधांचा वापर करून मिरगी हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. पाच वर्षांत जर व्यक्तीला एकदाही झटके आले नाहीतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार थांबवता येतात.

अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी झटका आलेल्या व्यक्तीची नीट काळजी घ्यावी. जीभ चावली जाऊ नये यासाठी दातांमध्ये लाकडी पट्टी वा कपडा ठेवावा. अशा व्यक्तीने मशिनवर काम करू नयेवाहन चालवू नये. तसेच पोहणेआगीजवळ काम करणे अशा गोष्टी कदापिही करू नयेत. रुग्णाच्या जवळ त्याचे नावपत्ताघेत असलेले उपचार आदी माहिती असलेले कार्ड नेहमी ठेवावेम्हणजे अपघाताच्या वेळी वा आकस्मिकपणे काही झाल्यास त्या माहितीचा उपयोग होईल.

साभार : डॉ. अंजली दिक्षीत  डॉजगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...   

أحدث أقدم