पॅरॅसिटॅमॉल कशासाठी वापरतात ?

औषधांच्या दुकानात जाऊन बर्‍याचदा तुम्ही तापासाठीच्या गोळ्या आणल्या असतील. क्रोसिनमेटॅसीनपॅमाॅल अशा विविध नावांनी विकल्या जाणाऱ्या या गोळ्यांमध्ये 'पॅरॅसिटॅमॉलनावाचे एक औषध असते हे तुम्हाला ठाऊक आहे काय ?

पॅरासिटेमॉल हे औषध गोळ्यांच्या तसेच पातळ औषधाच्या स्वरूपात मिळते. या औषधामुळे ताप कमी होतो. मेंदूतील तापमानाचे संतुलन करणाऱ्या केंद्रावर या औषधामुळे परिणाम होतो व ताप कमी होतो. साहजिकच कोणत्याही तापासाठी पॅरासिटामॉल हे औषध घेतल्यास ताप कमी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ताप हा रोग नाही तर ते केवळ रोगाचे लक्षण आहे. घरात मेलेल्या उंदराचा वास येत असेल तर अत्तर टाकून व सेंट फवारून काही काळ तो वास घालवता येईलपण दुर्गंधी कायमची घालावयाची असल्यास मेलेला उंदीर शोधून तो फेकून देण्याखेरीज दुसरा उपाय नाही. तसेच ताप ज्या रोगामुळे होतो तो रोग बरा केल्याखेरीज ताप कायमचा बरा होणार नाही.

ताप केव्हा येतोकिती वेळ राहतोजास्त असतो वा कमीयावर रोगांचे (जसे हिवतापक्षयरोग) निदान अवलंबून असते. त्यामुळे ताप आल्या आल्या पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेतल्याने निदानात अडचण येऊ शकते. ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज औषध घेऊ नये. कोणतेही औषध दुष्परिणामरहित नसते. त्यामुळे आवश्यकता असल्यासच औषध घ्यावे. खरे तर अंग थंड पाण्याने पुसणेकपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे या घरगुती उपायांनीही ताप उतरतो. प्रसंगी या उपायांचा वापर करावा.

सर्दीखोकला अशा सामान्य रोगात येणार्या तापासाठी हे औषध घ्यायला हरकत नाही. ताप उतरण्याखेरीज हे औषध वेदनाशमनही करते व सूजही उतरवते.

साभार : डॉ. अंजली दिक्षीत  डॉजगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...     

أحدث أقدم