कुत्रा आणि माणूस यांची सोबत हजारो वर्षांपासूनची आहे. पुरातन काळापासून कुत्रा माणसाबरोबर राहतो आहे. महाभारतात देखील धर्मराजाबरोबर स्वर्गाच्या दारापर्यंत कुत्रा बरोबर होताअशी आख्यायिका आहे. तुम्हीही कुत्रे पाळले असेल. सोबत म्हणून संरक्षण म्हणून किंवा गंमत म्हणूनही लोक कुत्रे पाळतात. कुत्रा हा इमानी प्राणी असल्याने तो खूप उपयुक्तही असतो.

सामान्यत: कुत्रे पाळताना लोक विशेष काळजी घेत नाहीत. व्यालेल्या कुत्रीच्या पिलांपैकी एखाद्या पिलाला घरातील छोटी मुले उचलून आणतात. असे पिलू मग घरात पाळले जाते. फार थोडे लोक कुत्र्याची पाळण्यापूर्वी गुरांच्या डॉक्टरकडून तपासणी करून घेतात. कुत्र्याचे नगरपालिकेत रजिस्ट्रेशनही फारच थोडे लोक करतात.

कुत्र्यापासून माणसाला होणारा महत्त्वाचा रोग म्हणजे रेबीज. कुत्र्याला हा रोग पिसाळलेले कुत्रे किंवा इतर वन्य प्राणी चावल्याने होतो. रेबीज हा विषाणूंमुळे होणारा रोग आहे. ही गोष्ट कुत्री पाळणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवायला हवी. रेवीज झालेले कुत्रे विचित्र वागायला लागते. दिसेल त्या व्यक्तीलावस्तूला चावायला लागते. रेबीजची लक्षणे दिसायला लागल्यानंतर ५ ते ६ दिवसांत कुत्रे मरते. दुसऱ्या प्रकारच्या रेबीजमध्ये कुत्रे शांत पडून राहते व त्याला कशातच रस नसतो. ४ ते ५ दिवसांत ते मरते. रेबीज झालेल्या कुत्र्याने आपल्या जखमेवर चाटल्यास किंवा आपल्याला चावल्यास आपल्यालाही हा रोग होऊ शकतो. रेवीज झालेल्या कुत्र्याची लाळ लागलेले पाणी. अन्नपदार्थ यांचे सेवन केल्यासही आपल्याला रेबीज होऊ शकतो. एकदा हा रोग झाला की मरण अटळ असते. रोग टाळण्यासाठी दंडात १५०० रु. खर्चून ६ इंजेक्शने घ्यावी लागतात. कुत्र्यामुळे हायडेंटीड सिस्ट नावाचा रोगही माणसास होतो. यात यकृतात वा इतर इंद्रियात फुग्यासारख्या गाठी येतात. शस्त्रक्रिया करून उपचार करावे लागतात.

यावरून लक्षात येईल कीकुत्रे पाळणे ही मजा असली तरी त्याबरोबर जवाबदारीही आहे. रेबीजविरोधी लस कुत्र्याला नियमितपणे देणेत्याचे रजिस्ट्रेशन करणेत्याला स्वच्छ ठेवणे ही मालकाची जबाबदारी आहे व दुसरे म्हणजे कुत्र्याशी जास्त जवळीक करणे टाळायला हवे. तरच कुत्रा पाळण्याचा आपल्याला आनंद होईलनाहीतर पुढे पश्चातापच करावा लागेल.

माहितीस्त्रोत : whatsapp समूह

أحدث أقدم