महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर | भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषणे | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती | 14 एप्रिल भाषणे | Dr. Babasaheb Ambedkar Bhashane | Dr. Babasaheb Ambedkar Mahiti

जन्म : १४ एप्रिल १८९१ महू, सेन्ट्रल प्रोविंस, ब्रिटिश भारत (सध्याचे मध्य प्रदेश)
मृत्यू : ६ डिसेंबर १९५६ (वय ६५) दिल्ली
शिक्षण : एम.ए., पी.एच.डी., डी. एससी., एलएल.डी., डी.लिट., बैरिस्टर एट लॉ
विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक
संस्था : समता सैनिक दल, स्वतंत्र लेबर पार्टी, अनुसूचित जाति फेडरेशन, भारत बौद्ध सोसायटी
उपाधी : स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष
राजनैतिक पार्टी : भारतीय रिपब्लिक पार्टी
पुरस्कार : भारतरत्न
जन्म बालपण शिक्षण : बाबासाहेबांचा जन्म ब्रिटीश केंद्रशासित असलेल्या महू या गावी झाला. बाबासाहेबांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे इस्ट इंडिया कंपनी मध्ये सेनेत कार्यरत होते. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी नेहमी प्रोत्साहित केले. रामजी १८९८ मध्ये मुंबईमध्ये स्थलांतरित झाले. मुंबईमध्ये बाबासाहेब एलफिस्टन रोडवरील गव्हर्नमेंट हायस्कुलमध्ये शिकू लागले. शिक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करुनदेखील आपल्याला मिळणाऱ्या स्पृश अस्पृश वागणुकीमुळे ते नेहमी व्यथित असत. १९०७ मध्ये बाबासाहेब मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये कॉलेजला प्रवेश मिळवला. अशा प्रकारे कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणारे ते पहिले अस्पृश्य भारतीय होते. सन १९१२ मध्ये बाबासाहेबांनी राजकारण विज्ञान आणि अर्थशास्त्र मध्ये आपली पदवी मिळवली व बडोदा राज्य सरकारची नौकरी स्विकारली परंतु लवकरच त्यांना परत मुंबईला यावे लागले कारण त्यांच्या वडिलांचा मृत्यू २ फेब्रुवारी १९१३ ला झाला.
परदेशातील शिक्षण आणि लिखाण : गायकवाड शासनाने बाबासाहेबांना प्रती महा ११.५ डॉलर स्कॉलरशिप प्रदान केले ज्यामुळे बाबासाहेबांना न्यूयॉर्क येथे जाऊन १९१६ मध्ये पी. एच.डी. पूर्ण करता आली. आपल्या पी. एच. डी. शिक्षणांतर्गत त्यांनी केलेल्या संशोधनावर त्यांनी एक पुस्तक लिहून प्रकाशित केले " Evolution of Provential Finance in British India. आपली डॉक्टरेट हि पदवी घेऊन बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकमध्ये प्रवेश मिळवला. स्कॉलरशिप बंद झाल्यामुळे बाबासाहेबांना लंडनमधील शिक्षण अर्धवट सोडून परत भारतात यावे लागले. भारतात येऊन ते बडोदा मध्ये पुन्हा काम करू लागले परंतु कामामध्ये जातीवाद भेदभाव अनुभवायला आल्यामुळे त्यांनी ती नौकरी सोडून स्वताचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला पण तो फारसा चालला नाही. पुढे त्यांच्या ओळखीच्या राज्यपाल लॉर्ड सिडनेममुळे त्यांना सिडनेम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनोमिक्समध्ये प्रोफेसरची नौकरी मिळाली. ह्याच दरम्यान कोल्हापूर संसाथांचे राजा शहाजी राजेमुळे ते पुन्हा लंडनला जाऊ शकले. लंडनमध्ये १९२३ मध्ये त्यांनी आपले संशोधन प्रोब्लेम्स ऑफ द रुपी पूर्ण केले. त्यांना लंडन विद्यापीठद्वारे डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी प्रदान करण्यात आली. ह्या काळात त्यांनी जर्मनीमध्ये अर्थशास्त्र अध्ययन चालू ठेवले. ७ जून १९२७ रोजी त्यांना कोलंबिया विश्वविद्यालयद्वारा पी एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
जातीयवाद विरुद्ध आवाज : १९१९ मध्ये डॉ. आंबेडकर ह्यांना भारत सरकार अधिनियम मधील साउथबोरोह समितिमध्ये प्रमुख विद्वान म्हणून आमंत्रित केले गेले, जिथे बाबासाहेबांनी दलित आणि अन्य धार्मिक समुदायांना पृथक निर्वाचिका आणि आरक्षण देण्याची वकालात केली. त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली ज्याद्वारा दलित वर्गात शिक्षण आणि आर्थिक व्यवसाय ह्यांचा प्रासार केला गेला. १९२७ मधे बाबासाहेबांनी जातीवादाविरुध्द व्यापक आंदोलन सुरु केले. ह्याच दरम्यान त्यांनी महड येथे पाण्याच्या मुलभूत अधिकारसाठी मोठे आंदोलन केले. आंबेडकरांना त्यांच्या अस्पृश्यासामाजातील लोकप्रियतेमुळे लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिशांनी आमंत्रित केले. ह्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांना पृथक निर्वाचिका देण्याचा आग्रह धरला. १९३२ मध्ये ब्रिटिशांनी पृथक निर्वाचिका देण्याची घोषणा केली ज्या विरुद्ध गांधीजीनी आमरण उपोषण सुरु केले. गांधीजींच्या उपोषणामुळे आणि इतर दबावामुळे बाबासाहेबांनी पृथक निर्वाचिका मागणी मागे घेतली, त्यामुळे बाबासाहेबांच्या इतर मागण्या जश्या मंदिरामध्ये प्रवेश स्पृश अस्पृश भेदाभेद बंद करण्याच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. निवडणुका लढवण्याचे आणि मतदानाचे आरक्षण लागू झाले.
संविधान निर्मिती : आपल्या अस्पृश्य लोकांच्या लढायच्या विवास्पद आणि गांधी विरोधी प्रतिमा असूनसुधा स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारने बाबासाहेबांना स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून निवडले. २९ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताच्या संविधान निर्मिती समितीचे त्यांना अध्यक्ष बनवण्यात आले. बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानातील काही महत्वाच्या मुद्यांचे हिंदीमधील अनुवादन खालील प्रमाणे आहे: “ संविधान पाठ मे संवैधानिक गारंटी के साथ व्यक्तिगत नागरिकों को एक व्यापक श्रेणी की नागरिक स्वतंत्रताओं की सुरक्षा प्रदान की जिनमें, धार्मिक स्वतंत्रता, अस्पृश्यता का अंत और सभी प्रकार के भेदभावों को गैर कानूनी करार दिया गया। अम्बेडकर ने महिलाओं के लिए व्यापक आर्थिक और सामाजिक अधिकारों की वकालत की और अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के लोगों के लिए सिविल सेवाओं, स्कूलों और कॉलेजों की नौकरियों मे आरक्षण प्रणाली शुरू के लिए सभा का समर्थन भी हासिल किया, भारत के विधी निर्माताओं ने इस सकारात्मक कार्यवाही के द्वारा दलित वर्गों के लिए सामाजिक और आर्थिक असमानताओं के उन्मूलन और उन्हें हर क्षेत्र मे अवसर प्रदान कराने की चेष्टा की जबकि मूल कल्पना मे पहले इस कदम को अस्थायी रूप से और आवश्यकता के आधार पर शामिल करने की बात कही गयी थी। २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेने बाबासाहेबांनी बनवलेले संविधान अंगिकारले.
बौद्ध धर्म स्वीकार : १९५० मध्ये बौद्ध धर्मप्रती आकर्षणामुळे बाबासाहेब श्रीलंकेला बौद्ध भिक्षु आणि विद्वान ह्यांच्या संमेलनाला हजर झाले. पुण्याला एक नवीन बौद्ध विहाराची स्थापना करून बौद्ध धर्मावर आपण पुस्तक लिहित असल्याची त्यांनी घोषणा केली, व पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आपण बौद्ध धर्म स्वीकारण्याची त्यांनी घोषणा केली. १९५६मध्ये त्यांनी बुद्ध एंड हिज़ धम्म हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आंबेडकरांनी नागपूर येथे एका बौद्धिक भिक्षुकडून पारंपारिक पद्धतीने तीन रत्न ग्रहण आणि पंचशील अंगीकारून बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
महापरीनिर्वाण : १९४८ मध्ये बाबासाहेबांना मधुमेह झाला. जून ते ऑक्टोबर १९५४ ह्या दरम्यान बाबासाहेब आजारपणामुळे फार अशक्त झाले त्यांची दृष्टी कमजोर झाली. राजकारणातील सततची दगदग ह्यामुळे त्यांची तब्येत अजून ढासळली. 6 डिसेंबर १९५६ रोजी खालवलेल्या तब्येतीमुळे महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी ह्या जगाचा निरोप घेतला.
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड (नाशिक)

------------------------------------

🇪🇺 इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

أحدث أقدم