स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ( जन्म २८ मे १८८३ ) या द्रष्ट्या, क्रांतीकारी देशभक्त अन् अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे ! राष्ट्र ' हेच त्यांचे जीवनमूल्य असल्याने त्यांचे एकमेवाद्वितीय साहित्य हे राष्ट्रहिताच्या अनुषंगानेच प्रसवलेले आहे. साहित्यिकही अनेक असतात आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा क्रांतीवीर साहित्यिक हा ' यासम हाच !'
स्वा. सावरकरांची मार्सेलिस येथील साहसी उडी :
स्वा. सावरकर यांना ब्रिटिशांनी लंडनमध्ये अटक केली. पुढील अभियोग हिंदुस्थानातील न्यायालयात चालवण्यासाठी त्यांना मोरिया' या आगनावेवर आरक्षींच्या (पोलिसांच्या) पहाऱ्यात चढवण्यात आले. प्रवासात आगनाव फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात थांबली. ८ जुलै १९१० ची सकाळ उजाडली. प्रातर्विधीसाठी जायचे आहे, असे सांगून सावरकर शौचालयात 6 गेले. आपल्या अंगावरील रात्रवेश (नाईट गाऊन) त्यांनी काचेच्या दारावर टाकून पहारेकऱ्यांना आतील काही दिसणार नाही, अशी व्यवस्था केली. उडी मारून गवाक्ष (पोर्ट होल) गाठले. शरीर आकुंचित करून त्यांनी स्वतःला अपरिचित समुद्रात झोकून दिले. छातीची आणि पोटाची कातडी सोलून निघाली. बंदिवान पळाल्याचे पहारेकऱ्यांच्या त्वरित लक्षात आले. त्यांनी पाठलाग केला. एव्हाना ९ फूट उंचीचा धक्का सरसर चढून फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवल्याने सावरकर स्वतंत्र झाले. काही अंतर पळाल्यावर ते समोर दिसलेल्या फ्रेंच आरक्षीच्या स्वाधीन झाले.
मागून आलेल्या पहारेकऱ्यांनी फ्रेंच आरक्षीला लाच दिली आणि बळाने, तसेच अवैधरीत्या सावरकरांना परत नौकेवर नेले. सार्वभौम फ्रान्सच्या भूमीवर सावरकरांना केलेल्या अटकेचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर गेला. ज्याचा अभियोग आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर गेला, असा पहिला भारतीय देशभक्त म्हणजे स्वा. सावरकर ! ही उडी देशभक्तांना आजही स्फूर्ती देते ॥
मार्सेलिसच्या समुद्रात उडी मारून भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक व्यासपिठावर नेणारे द्रष्टे स्वा. सावरकर |
स्वा. सावरकरांच्या मार्सेलिसच्या सागरी साहसाने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न प्रथमच जागतिक व्यासपिठावर अतिशय आवेगाने चर्चिला गेला. भारताचे स्वातंत्र्य हा सगळ्या दुनियेचा आस्थेचा आणि चिंतेचा विषय झाला. 'राजकीय आश्रय' या विषयाची सखोल चर्चा झाली. 'फ्रान्सच्या भूमीवर अवैध मार्गाने झालेली अटक हा ब्रिटिशांकडून स्वा. सावरकरांवर झालेला घोर अन्याय आहे, असे मत मार्क्सचा नातू लोंगे याने मांडले आणि ते युरोपमधील प्रसारमाध्यमांनी उचलून धरले. स्वा. सावरकरांना ब्रिटनने फ्रान्सकडे सुपूर्द करावे या मागणीने जोर धरला आणि तो प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावा लागला. स्वा. सावरकरांवर अन्याय झाल्याचे न्यायालयाला मान्य करावे लागले. फ्रान्सच्या पंतप्रधानाला त्यागपत्र द्यावे लागले ।'
अंदमानाच्या कारावासात पाठवण्याच्या आधी कारागृहातील शेवटच्या भेटीत स्वा. सावरकरांनी आपल्या तरुण पत्नीला केलेला उपदेश खालीलप्रमाणे...
बरें ईश्वराची दया असेल, तर पुनः भेट होईल. तो या सामान्य संसा मोह होऊ लागला, तर असा विचार करा की, मुला-मुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणावयाचे असेल, तर असले संसार कावळे चिमण्याही करीतच आहेत; पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल, मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूल-बोळकी आपण फोडून टाकली; पण त्यायोगे पुढेमागे हजारोजणांच्या घरी धूर निघेल आणि घर घर म्हणून करीत असतांनाही प्लेगने नाही का शेकडो जणांची घरे ओसाड पाडली, लग्नाच्या मंडपातून नवरा-नवरीस विलग हिसडून मृत्यूच्या दाढेत ढकलून दैवाने जोडपी विजोड करून टाकली ! असा विवेक करून संकटास तोंड द्या." स्वा. सावरकर (संदर्भ: माझी जन्मठेप ) राष्ट्राचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता असली पाहिजे!
१९३८ साली मुंबईत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून साहित्यिक सावरकरांनी हिंदूंना एक संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात स्वा. सावरकर म्हणाले, “आता सरते शेवटी मला हे सांगितल्यावाचून गत्यंतरच दिसत नाही. 'साहित्य हे आजच्या आपल्या राष्ट्राच्या परिस्थितीत दुय्यम तिय्यम कर्तव्य आहे. साहित्यिक सज्जनहो, सूज्ञहो, साहित्यासाठी जीवन आहे कि जीवनासाठी साहित्य ? आपले साहित्य हे राष्ट्रीय जीवनाचे एक उपांगच काय ते असेल, तर राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता, मुख्य साध्य असले पाहिजे. अगदी कलेसाठी कलेचा जो उपासक त्याच्याविषयीही मला आदरच वाटेल; पण असे उपासक त्या कलानंदात एखाद्या नाट्यगृहामध्ये रंगून गेले असता, जर त्या नाट्यगृहालाच आग लागली, तर कलेसाठी कलेला झिडकारून ते प्रथम जीव वाचवण्याच्या मार्गास लागतील. त्याचप्रमाणे राष्ट्र्राच्या प्राणावरच बेतले असता केवळ साहित्याची काय कथा ?” लेखण्या मोडा, बंदुका उचला ।
त्याप्रमाणे तुम्हीही लेखणी मोडून टाकावी नि बंदूक उचलावी. पुढील दहा वर्षांत सुनिते रचणारा एकही तरुण नाही निघाला तरी चालेल, साहित्य संमेलने नाही झाली, तरी चालतील ; पण दहा-दहा सहस्र सैनिकांच्या वीरचमू आपल्या खांद्यांवर नव्यातील नव्या बंदुका टाकून राष्ट्राच्या मार्गा-मार्गातून, शिबिरा-शिबिरांतून टप टप करीत संचलन करतांना दिसल्या पाहिजेत ।
• पाक लष्कराच्या खोडसाळपणाला स्वा. सावरकरांचा बिनतोड युक्तीवाद :
१९६५ च्या भारत-पाक युद्धापूर्वी पाकिस्तानच्या फौजा भारतीय प्रदेशावर हल्ले करत आत घुसत होत्या. त्यामध्ये भारतीय नागरिक मारले जात होते. नंतर मात्र आमच्या फौजा चुकून भारतीय प्रदेशात गेल्या, असे समर्थन पाकिस्तानकडून केले जायचे. स्वा. सावरकर व मेजर जनरल य. श्री. परांजपे यांच्या भेटीच्या वेळी सावरकर परांजपे यांना म्हणाले, “पाकिस्तानचे सैनिक चुकून आपल्या इथे येतात, मग आपल्याही सैनिकांनी चुकून पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ले करायला काय हरकत आहे ?”
त्यावर जनरल परांजपे म्हणाले, “तात्या, हे कसे शक्य आहे ? दीड हजार मैलांच्या सरहद्दीवर कुठे कुठे गस्त घालायची ? कुठे त्यांना अडवायचे आणि कुठे आपण काही करायचे ?"
स्वा. सावरकर लगेच म्हणाले, “दीड हजार मैलांची सरहद्द आपल्याला आहे. त्यांना नाही का ? ते आत येऊ शकतात, हल्ले करतात. तुम्हाला काय हरकत आहे ? असेच चुकून दिवस लाहोरपर्यंत जा आणि चुकून लाहोरही ताब्यात घ्या की !” मेजर जनरल परांजपे बघतच राहिले. एक
अंदमानातील मुसलमानांची मुजोरी मोडून काढणारे स्वा. सावरकर :
स्वा. सावरकर अंदमानात होते. त्या वेळी तेथील हिंदु आणि मुस्लीम बंदीवानांसाठी स्वतंत्र स्वयंपाक होत असे. स्वयंपाक झाल्यावर जेवणास बसण्यापूर्वी एक मुसलमान बंदीवान हिंदूंच्या अन्नपात्रांना स्पर्श करून निघून जात असे. 'मुसलमानाने स्पर्श केलेले अन्न खाल्ले, तर आपण बाटू', या भितीमुळे हिंदू बंदीवानांनी ४-५ दिवस अन्न घेतले नाही. ही गोष्ट सावरकरांच्या कानावर गेली. हिंदु धर्मावर आक्रमण करणाऱ्या या लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. त्यामुळे सावरकरांनी एक सोपी; पण नामी युक्ती केली. सावरकरांनी एका करवंटीत पाणी घेऊन 'अपवित्रः पवित्रो वा... हा शुद्धीमंत्र म्हणत सर्वांच्या अन्नावर शिंपडले आणि म्हणाले, "हे अन्न आता अभिमंत्रित झाले. त्यामुळे आता जो हे अन्न खाईल, तो हिंदु झाला."
असे झाल्यावर मात्र मुसलमानांवर उपासमारीची वेळ आली. त्यांनी नमते घेतले आणि सर्वांनी आपापले अन्नच खाणे सुरू केले.. पठाण अधिकाऱ्यांचा जाच व दहशत यांमुळे तेथील हिंदु कैदी मुसलमान होतात, असे सावरकरांच्या लक्षात आले. तुरुंगातील हिंदूंमध्ये इस्लामी धर्माचा प्रसार पद्धतशीररीत्या करण्यासाठी तेथील मुसलमानांचे संगनमताने प्रयत्न चालत. या गोष्टींचा प्रतिकार करण्याचे अवघड कार्य सावरकरांनी अंदमानच्या बंदीगृहात केले. अंदमानातच सावरकरांना हिंदूंच्या शुद्धीकरणाचे कार्य सुरू करावे लागले. '
हिंदूंनो, 'मी हिंदु आहे', हे सांगण्यास लाजू नका, हे सांगणारे सावरकर :
'स्वतःला हिंदु म्हणवण्यात उणेपणा किंवा अराष्ट्रीयता आहे, असे समजू नका. श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराणा प्रताप व गुरु गोविंदसिंग यांचा अभिमान बाळगण्यास लाजू नका. या सूर्यमंडळात हिंदूसाठी एक देश असलाच पाहिजे व तेथे त्यांची भरभराट झालीच पाहिजे. त्यासाठी शुद्धी (धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेणे) व संघटन यांकडे लक्ष द्या ! शुद्धीचे कार्य हे केवळ धार्मिक नाही, ते राजकीयही आहे.' - स्वातंत्र्यवीर सावरकर
श्रीरामाचा विसर पडला की काय ? :
स्वा. सावरकरांना श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याविषयी नितांत आदर वाटे. हे दोघे आपल्या राष्ट्राचे सेनापती, सारथी व श्रेष्ठ अधिपती आहेत, असे ते सांगत. १९०९ मध्ये त्यांनी लंडनमध्ये विजयादशमीचा उत्सव साजरा केला. प्रभु रामचंद्रांच्या अवतारकार्याचे स्मरण करून ते म्हणाले, “जेव्हा श्रीराम आपले पित्याच्या वचनासाठी वरवर, मुख्यतः राक्षस निर्दालनासाठी राज्य सोडून वनवासात शिरले, तेव्हा त्यांचे ते कृत्य महत होते. जेव्हा श्रीरामचंद्रांनी लंकेवर चाल केली आणि अपरिहार्य व धर्म्य युद्धाला सज्ज होऊन रावणाला ठार मारले, तेव्हा ते कृत्य महत्तर होते; परंतु जेव्हा शुद्धीनंतरही सीतेला उपवनात 'आराधनाय लोकस्य मुञ्चतो नास्ति मे व्यथा' म्हणून सोडून दिली, तेव्हा त्यांचे ते अवतारकृत्य महत्त होते ! रामाचे व्यक्तीविषयक वा कुलविषयक कर्तव्य त्यांनी त्यांच्या लोकनायकाच्या, राजाच्या कर्तव्यासाठी बळी दिले ! रामाचे अवतारकृत्य व श्रीरामचंद्रांची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेने हृदयात धराल तोपर्यंत, हिंदूंनो, तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे. तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहजलब्ध रहाणारी आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.” या श्रीरामाचाच विसर काँग्रेसी राज्यकत्र्यांना पडला आहे; पण त्यांचा कान उपटावा, असे आज एकाही साहित्यिकाला वाटत नाही. याला देशाचे दुर्दैव म्हणावे कि साहित्यिकांची अवनती म्हणावी ?
‘१९३७ मध्ये सावरकर रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून सुटले आणि त्यांना राजकारणात भाग घेण्याची अनुमती मिळाली. तोपर्यंत गांधींच्या नेतृत्वाखाली लढवल्या जात असलेल्या स्वातंत्र्य आंदोलनाचे पर्यवसान, अखंड हिंदुस्थानचे अखंड पाकिस्तान होण्याच्या दिशेने, बरेच अंतर काटले गेले होते. त्याही परिस्थितीत सावरकरांनी असा पराक्रम करून दाखविला की, ‘तदात्मानं सृजाम्यहम्’ कोटीतले ते असावेत कि काय, अशी शंका यावी. सावरकर एकाकी होते; पण इतिहास आणि परंपरा यांतून प्राप्त होणारी प्रेरणा, नीतीधैर्य आणि इच्छाशक्ती यांनी ओतप्रोत समृद्ध होते. त्यांनी पाकिस्तानच्या लोहमार्गावरून भरधाव सुटलेली भारतीय स्वातंत्र्यसमराची गाडी समोर उडी घेऊन दोन हातांनी रोखून धरली आणि इंजिन उचलून ते अखंड हिंदुस्थानच्या लोहमार्गावर आणून ठेवले. ब्रिटिश शासन, काँग्रेस, मुस्लिमलीग आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने भ्रमिष्ट झालेला हिंदु समाज, अशा चार आघाड्यांवर सावरकर एकटे लढत होते. त्या झटापटीत काही भाग निसटून पाकिस्तान निर्माण झाले; पण बाकी सगळा देश, हिंदूंच्या स्वामित्वाखाली रहाणे शक्य झाले. सावरकर दमले नव्हते. खचले नव्हते. ‘आणखी एक धक्का दिला, तर नवे पाकिस्तानही नष्ट करता येईल, असा विश्वास गलितगात्र हिंदूंमध्ये उत्पन्न करण्याच्या खटाटोपात ते व्यस्त होते.
भारत स्वतंत्र करण्याचे श्रेय हे सशस्त्र किंवा निःशस्त्र अशा कोणत्याही पक्षाचे नसून ते गेल्या दोन पिढ्यांतील सर्व पक्षांच्या सर्व स्वदेशनिष्ठांचे सामायिक श्रेय आहे. मी तर त्याच्याही पुढे जाऊन स्वानुभवाने असे सांगतो की, सशस्त्र वा निःशस्त्र अशा कोणत्याही गुप्त वा प्रकट चळवळीत ज्यांनी सक्रिय भाग घेतला नाही; परंतु ज्यांनी ज्यांनी आपापल्या हृदयात एक सहानुभूती बाळगली आणि 'देवा, माझ्या भारताला स्वतंत्र कर म्हणून अबोल प्रार्थना केल्या, त्या आमच्या लक्षावधी स्वदेशबांधवांनाही या राष्ट्रीय विजयाचे श्रेय त्या त्या प्रमाणात आहेच आहे.
स्वकीय शब्द नामशेष करून विदेशी शब्द बोकाळू देणे म्हणजे औरस मुलांची कत्तल करून मुलगा दत्तक घेणे. आपले तदर्थक जुने उत्तम शब्द असतांनाही किंवा नवीन स्वकीय शब्द उद्भावन असतांही त्या जुन्या शब्दांस लुप्त करून टाकणाऱ्या किंवा त्या नव्यांची नाकेबं 5/7 आणि म्हणूनच अगदी अनावश्यक असणाऱ्या विदेशी शब्दांस, मग ते उर्दू असोत वा शन्लश असोत वा इतर कोणतेही असोत, स्वभाषेत, निष्कारण वावरू देऊ नये. आपला स्वकीय शब्द नामशेष करून विदेशी बोकाळू देणे, हा काही शब्दसंपत्ती वाढविण्याचा मार्ग नव्हे आणि औरस मुलांची कत्तल करून मुलगा दत्तक घेत सुटणे, हा काही वंशविस्ताराचा मार्ग नव्हे.
(उदाहरणार्थ, लोकसभा, विधीमंडळ, प्रजासभा इत्यादी शब्द असतां ग्वाल्हेरप्रमाणे मजलिसअी आम या शब्दास कवटाळणे हा मूर्खपणा होय.)
(संदर्भ : सनातनचे 'भाषाशुद्धी' विषयक आगामी प्रकाशन, मुद्दा क्र. १. भाषाशुद्धीचा मुख्य उद्देश)
• कोणी हल्ला केलाच, तर मारत, मारत मरणे मला आवडेल, असे वृद्धावस्थेतही म्हणणारे स्वा. सावरकर !
श्री. पु. गोखले यांनी वृद्धावस्थेतील स्वा. सावरकरांना एकदा विचारले, “ तात्या तुमचे वय आणि ही क्षीण प्रकृती पहाता, आपण जो जांबिया जवळ ठेवता त्याचा कितपत उपयोग करू शकाल ?"
यावर सावरकर उत्तरले, “मी थकलो आहे, माझे वयही होत आले आहे, हे सगळे खरे. इथे कोणी माझ्यावर हल्ला करेल, असा संभवही जवळजवळ नाहीच; पण हे सर्व आपण काही गृहीत कृत्ये धरून काढलेले निष्कर्ष आहेत. आपला निष्कर्ष बरोबर येत राहिला आणि आपण शस्त्रधारी राहिलो, तरी काही नुकसान होणार नाही; पण आपला तर्क चुकला तर ? स्वामी श्रद्धानंदांचा तर्क असाच चुकला होता. अब्दुल रशीदने या हिंदूंचा अंदाज चुकणार, हा अंदाज बरोबर केला होता. समज, उद्या माझ्यावर कोणी हल्ला केलाच, तर माझी प्रतिकारशक्ती कमी पडेलही. प्रतिकार कमी पडला नि मला पराभव पत्करावा लागला, तर कधीच वाईट वाटणार नाही; पण प्रतिकार न करता मी पतन पावलो, तर मला अतोनात दुःख होईल. 'झुंजत रहाणे' हे मी आयुष्यभर केलेले आहे. कोणी हल्ला केलाच, तर मारत, मारत मरणे मला आवडेल. शस्त्र वापरण्याची वेळ आयुष्यात सहसा येत नाही; पण कधीही न येईल वाटणारी वेळ आलीच, तर नुसता पश्चाताप करून कार्यभाग साधत नाही. पुष्कळ वेळा नुसते शस्त्र जवळ आहे, यानेच काम भागते."
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विपुल लिखाण केले. त्यामध्ये अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, हिंदुपदपातशी, सहा सोनेरी पाने, शिखांचा इतिहास (अप्रकाशित) या व्यतिरिक्त विविध नाटके, कादंबरी इत्यादी आहेत.
असे थोर क्रांतिकारक, दूरदृष्टीचे नेते, लेखक, नाटककार आणि कवि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रयोपवेशन करून २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे देह सोडला. त्यांच्या चरणी सर्व भारतीयांचा शतश: प्रणाम !
अंदमान हे समस्त देशभक्तांचे स्फूर्तीस्थान | स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेच्या मुक्ततेसाठी अनेक मरणप्राय यातना सोसल्या, ती हीच भूमी ! त्यामुळेच अंदमानाच्या या सेल्युलर कारागृहाकडे पाहिल्यानंतरही देशप्रेम जागृत होते. त्यांनी देशासाठी सोसलेले आघात आठवतात. आज आझादीच्या घोषणा देऊन देशाशी गद्दारी करणारे ही खरी आझादी मिळवण्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांपेक्षा किती खुजे आहेत, त्याची जाणीव होते.
१९०६ मध्ये सातशे कैदी मावतील एवढ्या कारागृहाची उभारणी झाली. सात विभाग असलेली तीन मजली तुरुंगाची इमारत गच्चीवरून पहातांना सायकलीच्या चाकातील आऱ्यांप्रमाणे दिसते. येथे ब्रिटीश भारतीय कैद्यांचा अत्यंत अमानुष छळ करत असत. त्यामुळेच त्या शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत असत.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक