स्वच्छतेची महती...
संत गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. मनुष्याची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत भारत ख°या अर्थाने स्वच्छ होणार नाही. ज्या दिवशी मनुष्याची मानसिकता बदलेल त्या दिवशी भारत हा अमेरिका, इंग्लंड, जपानसारखा सुंदर, स्वच्छ असेल. सप्टेंबर महिन्यात स्वच्छता पंधरवडा पाळला जातो. भारतात विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. तसेच भारतासारखी संस्कृती जगात दुसरी नाही. भारतातील संस्कृती, पर्यटन, भारताचा ऐतिहासिक ठेवा भारताची शान आहे, परंतु भारतातील सौंदर्याला गालबोट लागते ते अस्वच्छतेचे. तसेच लोकांमध्येही स्वच्छतेचा अभाव आहे.
प्रत्येकाने जर स्वच्छतेचा गुण अवलंबविला तर देश स्वच्छ होण्यास नक्की मदत होईल. घर व आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे महिलांचे काम असते, असे सर्व जण मानतात, परंतु परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. पर्यटनस्थळी, बागेत, शाळेच्या परिसरात आपल्याला अस्वच्छता दिसते. ती दिसू नये यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी, महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवल्याने आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे घरातील सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा काढावा. हा कचरा इकडे तिकडे न फेकता तो कचराकुंडीत टाकावा. घरातील व घराबाहेरचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.
शहरात जे चित्र आहे त्याहीपेक्षा वेगळे चित्र ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात. हे लक्षात घेऊन शासनाने 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले. एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकासकामेही लोकसहभागातून करण्यात आली.
शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि काळजी वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन, घनकचऱ्याचे व्यवस्थापन यांसारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फूर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला. गावातील सरपंचापासून ते अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी या योजनेत योगदान दिले. स्वखुशीने स्वच्छता दूत म्हणून काम करणा°या या सर्व लोकांनी गावागावांत स्वच्छता केली. आरोग्य संपन्न आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला. एखाद्या अभियानात सहभाग नोंदवायचा असेल तर नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करणे गरजेचे असते.
गाव स्वच्छता, सार्वजनिक इमारती, रस्ते दुरुस्ती, पाणी स्वच्छता, माता बालसंगोपन, अंगणवाड्यांची स्वच्छता यासारखे उपक्रम राबविण्यात येतात.
त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी निर्मलग्राम पुरस्कार दिला जातो. त्यामुळे राज्यातील बऱ्याच गावांनी निर्मलग्राम पुरस्कार पटकाविला आहे. स्वच्छतेचे महत्त्व हे ग्रामीण भागापासून शहरी भागातील लोकांना पटले तर नक्कीच भारत स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच भारतातील अस्वच्छता दूर करण्यासाठी परदेशात जशी नियमांची कडक अंमलबजावणी केली जाते. तसेच कडक नियम भारतात हवे. अस्वच्छ परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने लाज न बाळगता प्रयत्न करावा.
संत गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. सर्वात प्रथम मनुष्याची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत भारत ख°या अर्थाने स्वच्छ होणार नाही. ज्या दिवशी मनुष्याची मानसिकता बदलेल त्या दिवशी भारत हा अमेरिका, इंग्लंड, जपानसारखा सुंदर, स्वच्छ असेल यात शंका नाही.
लेखक : सुलक्षणा पाटील, विद्यानगर
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/