शौचालय : जगाचे प्रेमपात्र!
काही समाज आणि आरोग्य शास्त्रज्ञांच्या मते, २०० वर्षांपासून माणसाचे जीवनमान २० वर्षांने वाढले आहे. कारण, माणसाने शौचव्यवस्थेसंदर्भात काळजी घेण्यास सुरुवात केली.
जागतिक शौचालय संघटनेच्या प्रयत्नांतून २००१ साली, १९ नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक शौचालय दिन' म्हणून जाहीर झाला. जागतिक शौचालय संघटनेचे निर्माता जॅक सिम आणि सिंगापूरच्या रेस्ट्रम असोसिएशन शौचालयाच्या जागृतीसाठी जागतिक स्तरावर जागृती व्हावी म्हणून या दिनाकडे पाहिले जाते. शौचालय म्हटले की डोळ्यासमोर टाळायलाच हव्या, असे वाटावे अशा गोष्टी समोर येतात. खरे तर समाज आणि आरोग्य अभ्यासकांच्या मते, शौचालय हे स्वयंपाकघराइतकेच स्वच्छ आणि महत्त्वाचे असायले हवे. कारण, शौचालय ही माणसाच्या आयुष्यातली कितीही ठरवले तरी न टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. माणसाला शौचालयाची गरज लागतेच लागते. अर्थात, शौचालयाचा वापर अनिवार्य असला तरी जगभरात ४० टक्के लोकांना शौचालयाची उपलब्धी नाही. भारतात २०१४ सालापासून गाव आणि शहरांमध्ये शौचालय निर्मितीचा धडाका सुरू झाला. आपल्या देशाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा विचार केला तर? तर पाकिस्तानमध्ये ४२ टक्के लोकांना शौचालयाची सुविधा नाही. तसेच जागतिक स्तरावर अत्यंत कमी शौचालय असणारा देश म्हणून इथिओपियाचे नाव अग्रणी आहे.
शौचालय प्रकरण गंभीर असले तरी त्याचा इतिहास रंजक आहे बरं. मोहेंजोदडो किंवा लोथलमध्ये इ.स. २५०० पूर्वी लोक शौचालय वापरायचे. आपल्या गड-किल्ल्यांमध्येही शौचालय आढळून येते. या पार्श्वभूमीवर पाश्चात्त्यांची ऐतिहासिक शौचालये पाहू. फ्रान्सचा सम्राट तेरावा लुईस हासुद्धा शौचालयाचा वापर करे. मात्र, त्याचे शौचालय राजसिंहासनामध्येच होते. दरबारात चौकशी करता करता तो शौचाला बसे. त्यामुळे शौचासाठी त्याला बाहेर जाण्याची गरज नसे. तर समता-बंधुता वगैरे मानणार्या पाश्चात्त्य देशांमध्ये उमराव वगैरेंच्या काळात गुलाम हातात शौचाचे भांडे घेऊन उभे राहत. या उमरावांना खेळता खेळता लघवी आली की, गुलाम हे पात्र घेऊन त्यांच्यापुढे उभे राहत. इतकेच काय? एकावर एक अंतर राखून शौचालयाचे दोन भांडे असलेलेही शौचालय असे. कारण काय, वरचे शौचालयाचे भांडे मालकाचे तर त्याच्या खालचे गुलामाचे. गुलामांना त्रास देण्याची इतकी हिडीस संकल्पना. हो, महाराणी व्हिक्टोरियाही हिरेजडित शौचालयाचा वापर करीत असे. राणीचा काळ सोडा, सध्या जेनिफर लोपेझ या प्रसिद्ध पॉप गायिकेला तिचा प्रियकर बेन एफ्लेकने अद्यावत किमती शौचालय भेट दिले होते. आज जगात भारतीय, पाश्चिमात्त्य आणि जपानी पद्धतीचे शौचालय मान्यता पावलेले आहे. तरीही रासायनिक शौचालय, ज्यामध्ये पाणी आणि रसायन टाकले की, शौच नष्ट होते, असेसुद्धा शौचालय विकसित झाले आहे. तसेच सगळ्यात महागडे शौचालय आहे ते इंसिलोनेट शौचालय. हे शौचालय मायक्रोव्हेवसारखे काम करते. विजेचे बटण दाबले की, शौचाची राख होते.
असो, काही समाज आणि आरोग्य शास्त्रज्ञांच्या मते, २०० वर्षांपासून माणसाचे जीवनमान २० वर्षांने वाढले आहे. कारण, माणसाने शौचव्यवस्थेसंदर्भात काळजी घेण्यास सुरुवात केली. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की जगभरात साथीचे रोग यायचे, त्या साथीच्या रोगाने माणसे किड्या-मुंग्यांसारखी मरत. हे साथीचे रोग कोणते? तर पाण्यातून किंवा अन्नातून होणार्या जंतुसंसर्गामुळे हे रोग होत. अन्न आणि पाण्याला जंतुसंसर्ग व्हायचा तो उघड्यावर होणार्या शौचामुळे किंवा शौचाची विल्ेहवाट व्यवस्थित न झाल्यामुळे. आधुनिक जीवनमानात माणसाने खाण्या-पिण्या- राहण्यासोबतच शौचासंदर्भातीलही सवयी बदलल्या. त्यामुळे माणसाचे आयुर्मान वाढले. जागतिक स्तरावर एक मूल्यांकन आहे की, जर स्वच्छ पाणी आणि शौचालयावर १ डॉलर खर्च केला तर आपले आरोग्यावर खर्च होणारे ४.३ डॉलर वाचतात. हे खरेच आहे कारण, नुकतेच १४५ देशांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यानुसार दररोज २२०० मुलं उघड्यावर शौच केल्यामुळे होणार्या आजाराने मृत्युमुखी पडतात. उघड्यावर शौच केल्यामुळे स्वच्छता करण्यासाठी किंवा आजारांवर उपाय करण्यासाठी आपल्या भारताचे तर वार्षिक २४ कोटी रुपयांचे नुकसान होते. यावरूनच या समस्येचे गांभीर्य लक्षात येते. त्यामुळे शौचालय ही जागतिक गरज असून, जगाचे प्रेमपात्र आहे, हे निश्चित.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/