जागतिक शौचालय दिन | जागतिक शौचालय दिन मराठी माहिती | World Toilet Day | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

DOWNLOAD PDF HERE

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे '१९ नोव्हेंबर' हा दिवस 'जागतिक शौचालय दिन' म्हणून जाहीर केला आहे. जगभर या दिनी स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून देण्‍यात येत आहे. आज भारतात कित्‍येक स्त्री-पुरुषांना असुविधेमुळे उघड्यावर शौचास बसावे लागते. त्‍यामुळे रोगराई मोठ्या प्रणावर फैलावते. जेंडर बजेट मध्ये लाखोंची तरतूद होऊनही कधी प्रशानाची टाळाटाळ तर कधी वित्‍तीय संकटामुळे लोक शौचालय बांधत नाहीत. ही महासत्‍ता होऊ पाहणा-या भारतासाठी दूदैवी बाब आहे.

स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून देणारे 'बाबा' :

महाराष्‍ट्र संताची भूमी आहे. अनेक थोर महात्‍मे महाराष्‍ट्रात घडून गेले आहेत. त्‍यापैकीच एक ' गाडगेबाबा ' होते. स्‍वच्‍छतेचे महत्‍व सर्वप्रथम गाडगेबाबा यांनी समाजाला करुन दिले. त्‍यांनी स्‍वत: हातात झाडू घेऊन रस्‍त्‍यावरची घाण साफ केली. रात्री किर्तनाच्‍या माध्‍यमातून लोकांच्‍या डोक्‍यातील घाण साफ केली. त्‍यांना स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून दिले होते.

भारतातील शौचालयाची स्थिती :

दिल्‍लीच्‍या संशोशन संस्‍थेने केलेल्‍या अहवालात म्‍हटले की, भारतात 3235 गावात शौचालये आहेत. परंतु त्‍यातील 43 % लोक शौचालय वापर करतच नाहीत . इशान्‍य भारतातील 45 टक्‍के लोक शौचालयाचा वापर करत नाहीत. सरकारी धोरणानुसार भारतात 110 मिलियन शौचालयांची आवश्‍यकता आहे.

दिनांक 19 नोव्हेंबर 2001 रोजी स्थापना करण्यात आलेल्या जागतिक शौचालय संघटनेचा स्थापना दिन ‘जागतिक शौचालय दिन’ म्हणून पाळला जातो.

145 देशांमध्ये केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, 58 टक्के अतिसार अस्वच्छतेमुळे होते. अतिसार या आजारामुळे 2015 साली पाच वर्षाखालील कमी वयाच्या 5,26,000 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला. यावर उपाय म्हणून शौचालयाला प्रोत्साहन दिले जात आहे. संघटनेने शौचालयांची असुविधा, त्यापासुन होणारे आजार आणि मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असणार्‍या शौचालयाची समस्या संयुक्त राष्ट्रसंघापुढे मांडली. संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या 2030 शाश्वत विकास लक्ष्य 6 (SDG-6) अंतर्गत, 2013 साली शौचालयाला मानवाची महत्त्वाची गरज म्हणून तांत्रिक आणि कायदेशीर मान्यता दिली.

जागतिक शौचालय संघटना (World Toilet Organization-WTO) ही एक आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था आहे. ही जगभरात स्वच्छता आणि शौचालय संदर्भात परिस्थितीत सुधारणेसाठी जबाबदार आहे. जॅक सिम यांनी WTO ची स्थापना दिनांक 19 नोव्हेंबर 2001 रोजी 15 सदस्य देशांसमवेत केली, जी आता 151 पर्यंत पोहचलेली आहे. संघटना जागतिक शौचालय परिषदेची आयोजक आहे. 2014 साली 18-20 नोव्हेंबर या काळात जगातला पहिला आंतरराष्ट्रीय शौचालय महोत्सव दिल्लीत आयोजित केला गेला होता.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

------------------------------
इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🇮🇳  स्वच्छ भारताच्या वाटेवर

🇮🇳  स्वच्छता अभियान घोषवाक्ये

🇮🇳  स्वच्छता अभियान कविता

🇮🇳  स्वच्छता अभियान शपथ 2022

🇮🇳  स्वच्छता अभियान शपथ

🇮🇳  स्वच्छतेची महती

🇮🇳  स्वच्छतेचे महत्त्व 1

🇮🇳  स्वच्छतेचे महत्त्व 2

🇮🇳  स्वच्छतेचे अभियान संदेश

------------------------------

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

------------------------------

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

أحدث أقدم