सद्भावना दिनानिमित्ताने सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करण्याचा कार्यक्रम....
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
परिपत्रक क्र.जपुती- २०२३/प्र.क्र.१७३/कार्या. २९,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक १४ ऑगस्ट, २०२३
परिपत्रक :
१) दिनांक १८ जानेवारी, २०२३ च्या शासन परिपत्रकान्वये दिनांक २० ऑगस्ट, २०१३ रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
२) तथापि, युवा कल्याण आणि क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी अ. क्र. २ येथील दिनांक १०.०८.२०२३ च्या पत्रान्वये रविवार, दिनांक २० ऑगस्ट, २०२३ ऐवजी शुक्रवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचित केले आहे.
३) यास्तव युवा कल्याण आणि किडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अ.क्र. २ येथील पत्रान्वये दिलेल्या सूचनांनुसार शुक्रवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०१३ रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा असे याद्वारे सूचित करण्यात येत आहे.
४) सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात असले असून त्यांचा संकेतांक २०२३०८१४१८२८४०८३०७ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
रो. दि. कदम - पाटील
उपसचिव, महाराष्ट्र शासन
✤•⊰❉⊱•═•⊰◆⊱•═•⊰❉⊱•✤
सद्भावना दिवस प्रतिज्ञा
“मी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करुन व संविधानिक मार्गाने सोडवीन.”
✤•⊰❉⊱•═•⊰◆⊱•═•⊰❉⊱•✤
इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
📲 गिरीश दारुंटे सूत्रसंचालन PDF
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉