शिक्षक दिन कविता | शिक्षक दिन शायरी | शिक्षक दिन माहिती | Teachers Day Poems-Shayari | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

शिक्षक दिन कविता

DOWNLOAD PDF HERE

1] शिक्षक म्हणजे...

शिक्षक म्हणजे एक समुद्र,

ज्ञानाचा... पावित्र्याचा,

एक आदरणीय कोपरा,

प्रत्येक व्यक्तीच्या मनातला...

शिक्षक अपुर्णाला पूर्ण करणारा...

शिक्षक, शब्दांनी ज्ञान वढविणारा,

शिक्षक, जगण्यातुन जिवन घडवणारा,

शिक्षक तत्वातून मुल्ये फुलवणारा...

ध्येय दिसते, तिथे नेतो शिक्षक,

सत्य ते, शिकवतो, वदवून घेतो तो शिक्षक,

ज्ञानाची ओळख... पुर्णत्व म्हणजे शिक्षक,

निस्वार्थ तळमळीने शिकवितो तो शिक्षक...

शिक्षा, एक नावडते अंग शिक्षकाचे,

त्यातून ही ध्येय असते ज्ञानदेण्याचे,

शिक्षक अचरणातुन ही शिकवत असतो,

म्हणूनच शिक्षक पूर्ण असावा लागतो.

नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,

नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,

नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,

नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक !

कवी : संदीप मधुकर चिंतामन

2] शिक्षक...

आई-बाबांनी आम्हास जीवन दिले,

पण जीवन कसे जगावे तुम्ही शिकविले.

आई-बाबांनी आम्हास जेवणाचे ताठ वाढून दिले,

ते जेवण कसे आणि किती खायचे तुम्ही शिकविले.

आई-बाबांनी आम्हास संस्कार दिले,

पण ते संस्कार कसे टिकवायचे तुम्ही शिकविले.

आई-बाबांनी आम्हास मोठे होताना पाहिले,

पण तुम्हीच खऱ्या अर्थाने आम्हास मोठे केले.

आई-बाबांनीही आमच्याकडे किंचित स्वार्थी अपेक्षेने पहिले,

पण तुम्हीच सारे आमच्यासाठी निस्वार्थीपणे केले.

स्वामी तिन्ही जगाचे आई- बाबापुढे झुकले,

ते आई-बाबाही आमच्यासाठी तुमच्यापुढे झुकले.

कवी : निलेश बामणे

3] शिक्षक म्हणजे...

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो,

ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात,

बेदरकारपणे ज्ञानाची पानं.

त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते,

अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या

अस्फुट चित्कांरांना,

किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी लटकेली असतात

कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली 

इवलाल्या चेहऱ्याची निरागस अक्षरे

शिक्षक नसतो कधीच बिचारा,

तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा

त्याच्याच स्वामित्वाने महत्व येत असते शाळेला

तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ

नखशिखांत अंधार भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून

सूर्याचं तेज बाहेर काढणारा

तो समाजसुधारक क्रांतीकारकही तोच

कित्येक चेतनांना पाठबळ असते

त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे

शिक्षकाला जपावी लागतात

कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड

आणि आकार द्यावा लागतो

एका मुक्त पणे बागडणाऱ्या

निराकार चैतन्याला

कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं

जाणून 'घ्यावी लागतात बोल

खोल खोल काळजाच्या आत निर्ममपणे...

कधी अंधारही प्यावा लागतो बिनबोभाटपणे

तेव्हा कुठे चमकतात...

उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर

त्याच्या सोबतील असतेच की

खडूची धारदार तलवार अन

फळ्याची ढाल असते पाठीशी

विश्वास ठेवा... एक ना एक दिवस

अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.

अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून

त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल.

कवी : संतोष सेलुकर

--------------------------------

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

👨🏻‍🏫 शिक्षक दिन मराठी सूत्रसंचालन

👨🏻‍🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन

👨🏻‍🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -परिचय

👨🏻‍🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हिंदी

👨🏻‍🏫 शिक्षक दिन मराठी भाषण 1

👨🏻‍🏫 शिक्षक दिन मराठी भाषण 2

👨🏻‍🏫 शिक्षक दिन कविता

👨🏻‍🏫 शिक्षक दिन शायरी

👨🏻‍🏫 शिक्षक दिन हिंदी भाषण 1

👨🏻‍🏫 शिक्षक दिन हिंदी भाषण 2

👨🏻‍🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 1

👨🏻‍🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 2

👨🏻‍🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 3

👨🏻‍🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 4

--------------------------------

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

--------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

--------------------------------

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

أحدث أقدم