मकर संक्रांत महत्व |
जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो. तर महाराष्ट्रात मकर संक्रांत व पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.
आपण जाणतोच की भारत हा विविध सणांचा देश आहे. प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण साजरा होत असतोच. यातच नव्या कॅलेंडर वर्षात पहिला आणि महत्त्वाचा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा. हा सण सगळे रुसवे फुगवे विसरून जाऊन, गुण्या गोविदाने राहायची शिकवण देणारा आहे. इतर सणांप्रमाणे मकर संक्रांतीला देखील एक वेगळे महत्व आहे आणि याला वैज्ञानिक आधार देखील आहे. आज आपण याचे महत्व आणि वैज्ञानिक आधार दोन्ही वर प्रकाश टाकणार आहोत.
संक्रांती का साजरी केली जाते?
14 जानेवारीलाच का?
सणाचे नाव मकर संक्रांतीच का?
इत्यादी बाबी आपण समजून घेऊयात...
1. कसे पडले नाव ?
मकर एक रास आहे आणि सूर्य एका राशि मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांती दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्यामुळे या सणा ला मकर संक्रांती असे म्हणटले जाते.
याला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. इत्यादी...
2. दरवर्षी एकाच तारखेला येणारा सण :
कदाचित हा हिंदु संस्कृती मधील एकमेव असा सण असेल जो एकाच तारखेला येतो. याच कारण हा सण सोलर (सूर्याच्या स्थान वर) कॅलेंडर फॉलो करतो. बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडर (चंद्रमा च्या स्थना वर ) आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 तारखेला साजरा केला जातो.
3. तीळ आणि गूळ यांचे महत्व :
मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू बनवायची परंपरा आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा अशी मान्यता आहे. जर याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास गूळ शरीराला थंडीमध्ये उष्णता देईल आणि तीळा मुळे शरीरात आवश्यक प्रमाणात स्निग्धता राहील असे आहे.
4. नाव अनेक पण सण मात्र एकच :
संक्रांति ही काय फक्त भारतातच साजरी नाही होत. ही आशिया खंडातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. याला नेपाळ मध्ये माघी किंवा माघी संक्राती, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. पण हा सण मात्र एकच आहे.
5. पतंग उत्सवाचे महत्व :
भारतात गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी हा सण पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते. पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाण व्हिटॅमिन D मिळते. याने थंड हवे पासून होणाऱ्या समस्या पासून दूर राहायला मिळते.
6. दिवस आणि रात्र एकसमान :
या दिवसा अगोदर रात्र मोठी असते दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवास मोठा होत जातो. या दिवसा पासून थंडी कमी होत जाते.
अशा या नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !!
तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे मराठी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे हिंदी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे इंग्रजी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषणे हिंदी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषण संस्कृत
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
🇮🇳 प्रजासत्ताक मराठी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक हिंदी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक इंग्रजी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक मराठी प्रास्ताविक
🇮🇳 प्रजासत्ताक हिंदी प्रास्ताविक
🇮🇳 भारतीय राष्ट्रध्वज ध्वजसंहिता
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
🇮🇳 प्रजासत्ताक दिन रांगोळी नमुने
🇮🇳 मराठी देशभक्तीगीते pdf डाऊनलोड
🇮🇳 हिंदी देशभक्तीगीते pdf डाऊनलोड
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉