शहीद भगतसिंग व गांधीजी | क्रांतिकारक भगतसिंग मराठी भाषण | शहीद दिन मराठी भाषण | शहीद दिन माहिती | Shahid Din Marathi Speech | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फ़ाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फ़ाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली.

भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फ़ाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फ़ाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फ़ाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फ़ाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी " आपल्या ताठरपणाचे समर्थन केले कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे पाहिले व न्यायाची कागदपत्र पाहिले अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले. " भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर यंग इंडिया " मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.

PDF डाऊनलोड करा.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

 शहीद दिन उपयुक्त भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎙️ 23-मार्च-शहीद-दिन-भाषण

🎙️ क्रांतिकारक-भगतसिंग-परिचय

🎙️ हुतात्मा-सरदार-भगतसिंग

🎙️ सरदार-भगतसिंग-विचार

🎙️सरदार -भगतसिंग-व-लेनिन

🎙️ सरदार -भगतसिंग-व-गांधीजी

🎙️ शहीद-भगतसिंग-हिंदी-माहिती

🎙️ शहीद-भगतसिंग-इंग्रजी-माहिती

🎙️क्रांतिकारक-सुखदेव-माहिती

🎙️क्रांतिकारक-राजगुरू-माहिती

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

أحدث أقدم