माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची  उन्हाळी सुट्टी 2033 व शेक्षणिक वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत | Summer Vacation 2023 & Commencement of Academic Year 2023-24


महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालनालय

माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य,

पुणे ४११००१

ई-मेल : doesecondary@gmail.com

फोन नं. : ०२०-२६१२६४६३

महत्त्वाचे :

क्र. : शिसा 23 / (A01) / उन्हाळी सुट्टी / एम. 1/1728

दि. : 03 एप्रिल 2023

प्रति,

1. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

2. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व

3. शिक्षण निरीक्षक (उत्तर पश्चिम / दक्षिण), बृहन्मुंबई

विषय : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2023 ची उन्हाळी सुट्टी व शेक्षणिक वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत.

संदर्भ : शासन परिपत्रक क्र. संकिर्ण - 2022/ प्र.क्र.58 / एस. डी. 4. दि. 11/04/2022

उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय परिपत्रकानुसार शासनाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना दोल्यात येत आहेत.

1. मंगळवार, दि. 02 मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. 11 जून, 2023 पर्यंत ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये दुसरा सोमवार, दि. 12 जून, 2023 रोजी शाळा सुरु करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चोथा सोमवार दि. 26 जून, 2023 रोजी सुरु होतील.

2. इ. 1 ली ते इ.9 वी व इ.11 वी चा निकाल दि. 30 एप्रिल, 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. तथापि, तो निकाल विद्यार्थी / पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.

3. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याएवेजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणाच प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक माध्यमिक) यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक निर्देश आपले स्तरावरुन द्यावेत.

4. माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्टया 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

5. वरीलप्रमाणे शाळेच्या सुट्टी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले स्तरावरून सर्व संबंधितांना सूचीत करावे.

कृष्णकुमार पाटील

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत :

1. मा. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय मध्यवती इमारत पुणे - 01 यांना माहितीस्तव सविनय सादर

2. कक्ष अधिकारी (एसडी-4), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई 32 याना माहितीस्तव सादर

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

इतरही उपयुक्त माहिती

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

أحدث أقدم