योग दिनाचे महत्व | जागतिक योग दिन | आंतरराष्ट्रीय योग दिवस | International Yoga Day

योग दिनाचे महत्व | जागतिक योग दिन | आंतरराष्ट्रीय योग दिवस | International Yoga Day | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवसआंतराराष्ट्रीय दिवस म्हणतात. भारत सरकारच्या प्रयत्नाने सुरू झालेला व जगभर पाळला जाणारा असाच एक दिवस म्हणजे योग दिवस. पैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत.

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवसआंतराराष्ट्रीय दिवस म्हणतात. भारत सरकारच्या प्रयत्नाने सुरू झालेला व जगभर पाळला जाणारा असाच एक दिवस म्हणजे योग दिवस. पैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत.

केवळ आसन किंवा प्राणायाम यांनाच बऱ्याच वेळेला आपण योग समजत असतो. मात्रतसे नसून योगाची व्याप्ती खूप मोठी आहे. युज्‌ या मूळ संस्कृत धातूपासून तयार झालेल्या योग या शब्दाचा अर्थ "जोडणेअसा होतो. आपलं शरीरमन आणि आत्मा यांना जोडणे याला योग म्हणतात. आरोग्य या शब्दाची जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली व्याख्या, "शरीरमनेअध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्‌या तंदुरुस्तीअशी आहे.

योग ही सर्वांगीण आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे असे म्हणायला हरकत नाही. भगवद्‌गीतेनुसार योगाची ही परंपरा अनादी अशी असून स्वतः भगवान श्रीकृष्णाना "योगेश्‍वरअसे म्हटले असले तरीही ते योगशास्त्राचे उद्गाते नव्हेत. भगवान पतंजलीदेखील योगशास्त्राचे उद्‌गाते नसून त्यांनी योगाला सुसूत्रतेने बांधण्याचे केलेले योगदान अनन्यसाधारण आहे. योगाचे उद्‌गाते भगवान शंकर असून त्यांनी पहिल्यांदा पत्नी पार्वतीला योग सांगितल्याचे उल्लेख पुराणात आढळतात.

संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. याच दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय योग दिन देशभर सर्व शैक्षणिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये व जगभर साजरा होणार आहे. जवळपास पाच हजार वर्षांहून अधिक मोठी परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.

आचार्य पतंजलींनी योगाची व्याख्या करताना "योग:स चित्तवृत्तीनिरोध:अशी केली आहे. याचा अर्थ मनाला स्थिर करणे म्हणजे योग. "समत्वं योगमुच्यते।असे भगवद्‌गीता सांगते. सिद्धी आणि असिद्धी या दोहोंबाबत समान दृष्टी ठेवून कर्म करत राहणे म्हणजे योग. याशिवाय "योगः कर्मसु कौशलम्‌।असेही भगवान श्रीकृष्ण म्हणतात. कर्मयोगज्ञानयोगराजयोगहठयोग असे विविध योगमार्ग दिसून येतात.

योग ही अशी निरंतर प्रक्रिया आहे जी कायिकवाचिक आणि मानसिक या तीनही पातळींवर स्थैर्य प्रदान करून माणसाला सर्वार्थाने निरोगी ठेवते. सुश्रुत संहितेत "अनागताबाधा प्रतिषेधनावाचा अध्याय आहे. अनागताबाधा म्हणजे अद्याप जी आलेली नाहीत अशी दुखणी किंवा आजार. या अध्यायात दिनचर्येचे सविस्तर वर्णन करून या "अद्याप न आलेल्याविकारांना दूर ठेवण्याचा मार्ग दाखवला आहे. "हेयं दुःखम्‌ अनागतम्‌।असे सांगत असतानाच पतंजली योगाची आरोग्यविषयक व्याप्ती वाढवतात. निरोगी राहण्यासाठी योग हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अंग बनायला हवे.

आयुर्वेदाप्रमाणे योगाची देखील आठ अंगे आहेत. यमनियमआसन आणि प्राणायाम हे बाह्य अंगे शरीराकडे अधिक लक्ष देताततर प्रत्याहारधारणाध्यान आणि समाधी हे आंतर अंगे आहेत. योग मन आणि आत्मा यांच्या पातळीवर कार्य करून साधकाला मोक्षाप्रत पोहोचवतात. आसने आणि प्राणायाम यापुरतेच योगाला मर्यादित ठेवणे हे अयोग्य आहे. योगशास्त्र मानवी जीवनाला हिऱ्याप्रमाणे पैलू पाडून लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही पातळीवर त्याला अनमोल बनवते. म्हणून प्रत्येकाने योगाभ्यासक बनायला हवे. "आंतरराष्ट्रीय योग दिनहा केवळ एका दिवसापुरता साजरा करण्याचा दिवस न राहता आपल्या सगळ्यांची दैनंदिन योगाकडे वाटचाल घडवणारा ठरायला हवा.

व्यायामाकडे दुर्लक्षबैठी जीवनशैलीताणतणाव आणि अनियंत्रित आहार वगैरे कारणांनी अनेकजण मधुमेहाची शिकार होत असतात. मग नियमित तपासण्या आणि ऍलोपॅथीक औषधे सुरू करावी लागतात. हळूहळू औषधांचा डोस वाढवावा लागतो. मग कोलेस्टेराल वाढून बीपीचाही त्रास सुरू होतो. अशातच जर ट्रेडमील टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि डॉक्‍टरांनी अँजिओग्राफी करण्यास सांगितले तर जीवन किती क्षणभंगुर आहेयाची खात्री पटते. मग भातबटाटेउपवासाचे व गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात.

सगळे प्रयोग करून झाल्यानंतर मग योगाचा क्‍लास करून योगासनेप्राणायाम आणि ध्यान (मेडिटेशन) सुरू केले असता बराच फरक पडायला सुरुवात होते. यामुळे महत्वाचे म्हणजे हृदय एकदम तंदुरुस्त बनते. रोज जेवणात एकदा भात खाल्ला तरी चालतो. काही जणांनी तर वयाच्या 72 व्या वर्षी योग करणे सुरू केले आणि आज 80 च्या पुढे वय असूनही एवढे ते तंदुरुस्त आहेत की स्वतः योगाची शिबिरे घेतात. म्हणजे योग करण्यास वयाचे बंधन नाही. चांगल्या आरोग्यासाठी त्यांचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे कोणत्याही धार्मिक अथवा राजकीय हेतूने प्रेरित अशा पद्धतीने या योग दिनाकडे पाहण्यापेक्षा आपल्याच आरोग्याचे रक्षण करणारी जीवनपद्धती म्हणूनच योगसाधनेकडे पाहिले पाहिजेहे या निमित्ताने सांगावेसे वाटते.

साभार : विलास पंढरी (Dailyhunt)

प्रार्थना व गीते डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

--------------------------------

इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻