पंडित नेहरू जीवनकार्य...
ऑगस्ट क्रांतीचा वणवा : मुंबईच्या गवालिया टँक येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरलं होतं. याप्रसंगी महात्मा गांधी, मौलाना आझाद सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्याचा निर्णय घेऊन त्यांना चलेजाव चा सज्जड इशारा दिला. यावेळी नेहरु आपल्या भाषणात म्हणाले की, "या लढ्यात आता माघार नाही. यात आम्ही विजय मिळवून आझाद हिंदुस्थानाच्या भूमीवर उभे राहू, अन्यथा खवळलेल्या महासागरात बुडून जगातून नाहिसे होऊ." करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची घोषणा करुन त्यांनी जनमानसाच्या अंत:करणात क्रांतीची प्रखर ज्योत प्रज्वलित केली.
इंदिराजींची उत्तम जडणघडण : प्रत्येक देशातील ज्येष्ठ नेते व तेथील परराष्ट्रीय धोरणाची माहिती व्हावी, यासाठी नेहरु हे इंदिरा गांधींना आपल्यासोबत परदेश दौर् यात नेत असात. त्यामुळे इंदिराजींची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्यांशी ओळख झाली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य लढ्याची तसेच त्यातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांचा परिचय व्हावा, याकरिता नेहरुनी इंदिराजींना महात्मा गांधीच्या सहवासात ठेवलं. त्यामुळे इंदिराजींच्या मनात क्रांतीची भावना निर्माण होऊन त्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या व त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. पंडितजींनी इंदिराजींची बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जडणघडण उत्तमरित्या केल्याने त्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकल्या. इतकेच नव्हे तर त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्या म्हणून गणल्या गेल्या.
अलिप्तवादी राष्ट्रगटाची उभारणी : नेहरु हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरु हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पराराष्ट्र खातं त्यांनी आपल्याकडेच ठेवलं. अमेरिका व रशिया या दोन महाशक्तिंशी नेहरुंचे मित्रत्त्वाचे संबंध असल्याने एकाशी मैत्री, तर दुसर् याशी शत्रुत्त्व करण्यात त्यांना स्वारस्य नव्हतं. यासाठी त्यांनी अलिप्तवादी धोरण अंगिकारले. देशा-देशांमधील कोणताही वाद-तंटा शांततेने, वाटाघाटीवरुन, सामोपचाराने सोडविण्याचे कौशल्य पंडितजींच्या अंगी होत. ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान विल्यम चर्चिल यांनी "You are the light of Asia" या शब्दात नेहरूंचा गौरव केला. पंडीतजींच्या आंतरराष्ट्रीय किर्तीची ही पावतीच ठरली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरुंना 1955 साली भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले.
पंचशील तत्त्वाद्वारे शांतीचा संदेश : जगात शांतता व सह-जीवनाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी विश्वशांतीचा ध्वज खाद्यांवर घेऊन नेहरूंनी पंचशील तत्त्वांची आखणी केली. परस्परांचे राष्ट्रीय व प्रादेशिक ऐक्य व सार्वभौमत्त्वाचा भंग करु नये, एकमेकांवर आक्रमण करु नये, एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करु नये, परस्परांच्या समानतेला व हितसंबंधाला धक्का पोहोचू नये आणि शांततामय सह-जीवनाभर भर द्यावा. विशेष म्हणजे चीन सारख्या बलाढ्य राष्ट्राला देखील नेहरूंनी पंचशील तत्त्वे स्वीकारण्यास भाग पाडले. जगभरात शांतीदूत म्हणून नेहरूंची ख्याती होती.
आधुनिक भारताचे शिल्पकार : औद्योगिक व कृषी क्षेत्रात संपन्नता लाभल्याशिवाय जगाच्या स्पर्धेत भारत टिकणार नाही याची पक्की जाण नेहरुंना होती. कृषी उत्पन्न वाढावे तसेच वीज निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नेहरूंनी पंजाबमध्ये भाकरानांगर, ओरिसात हिराकुड, आंध्रप्रदेशात नागार्जुन सागर हे मोठे प्रकल्प सरकारी पैशांतून उभारले. आणखी एक पाऊल पुढे जाऊन पंडीतजींनी उद्योगपती टाटाच्या मदतीने जमशेदपूर येथे पोलादाचा कारखाना, रशियाच्या साहाय्याने मध्यप्रदेशात भिलाई येथे पोलादाचा कारखाना, ब्रिटनची मदत घेऊन पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर येथे, तर जर्मनीच्या साहाय्याने ओरिसातील सरकेला येथे पोलादाचे कारखाने स्थापित केले. शेत जमीन सुपिक व्हावी व तिचा कस वाढवा यासाठी बिहारमधील सिंद्री येथे खत कारखान काढण्यास नेहरूंनी चालना दिली, 'औद्योगिक व कृषी विकासासाठी धरणं व पोलाद कारखाने ही भारताची आधुनिक मंदिरे होत.' असं नेहरूंच पुरोगामी धोरणं होतं.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/