धन्य ते शिवाजी महाराज
आणि धन्य त्यांचे मावळे...
सुड घेण्या अफ़जल वधाचा
पेटुन उठली होती अदिलशाही,
पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती
शाहिस्ता रुपी मोगलाई ।
निघाली एक फौज मोठी विजापुरी,
महराज होते त्यावेळी कोल्हापुरी |
वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने,
४० हजारी फौज लढत होती जिद्दीने ।
उन पावसाची न करता तमा
फौज लढली महिने चार,
वेढा असाकी अवघड होते
लहान मुंगीसही करणे पार |
करुन संपले प्रयत्न मराठ्यांचे
पन्हाळगडाबाहेरील सारे,
फ़िरले होते महाराजांचे नशिब,
उलटे वाहत होते वारे ।
रात्री एक शोधुनी बिकट वाट
गडावर आला हेर महादेव
गडावरी पाहुनी त्यास
भरीला सर्वामध्ये नवा चेव |
पाहत होते वाट राजगडी
सर्वांसह माँसाहेब जिजाई,
गाजवण्या शौर्य आले
पुढे बाजीप्रभु आणी शिवा न्हाई ।
राजे निसटले पोहचली
सिद्दीच्या गोटात बात,
जणु काही आदिलशाहीवर
झाला प्रचंड वज्रघात |
अंगकाठी रुपरचना होती
शिवा न्हाव्याची महाराजा सारखी,
करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनिम
तयार दुसरी पालखी ।
शिवा काशिदास दिसत होते
समोर आहे मरण,
पण गेला तो शिवाजीराजे
बनुन सिद्दीस शरण |
प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे,
किंचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो,
मरताना शिवा काशिद बोलतो...
" सोंगाचा मी शिवाजी
म्हणुन काय पालथा पडतो " |
समोर दिसत होते
सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत,
स्वराज्यासाठी केली नाही
स्वामीनिष्ठेनी जिवाची खंत |
गजापुरच्या घोडखिंडीत
बाजीप्रभुंनी घडवला एक इतिहास,
पण विसरु नका तुम्हीही
शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास |
साभार : अरविंद तोष्णीवाल
इतरही शिवजयंती उपयुक्त माहिती
शीर्षकावर क्लिक करा.
🎙️ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ शिवछत्रपती - स्वराज्याचे दैवत
↪️ महानयोद्धे शिवछत्रपती-इंग्रजी 1
↪️ राजे शिवाजी भोसले-इंग्रजी 3
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻