मराठी काव्यविश्वात कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना सदैव प्रेरणादायीच आहेत. त्यांची कणा हि कविता अशाच कवितांपैकी एक मैलाचा दगड असणारी व स्फूर्ती देणारी आहे.
कणा : वि. वा. शिरवाडकर
ओळखलत का सर मला ?
पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले,
केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून :
'गंगामाई पाहुणी आली,
गेली घरट्यात राहुन'.
माहेरवाशीण पोरीसारखी
चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी,
बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली,
होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती
पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे
सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे,
चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नकोत सर,
जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन,
फक्त लढ म्हणा ' !
नटसम्राट : वि. वा. शिरवाडकर
' नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत नाजुक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरूणांचाही वृध्दांकडे पहाण्याचा दृष्टीकोन देखील या नाटकाने बदलला...
नटसम्राट " हे नाटक अभिनयाचा अभ्यास करायला शिकवते व खूप गोष्टी शिकवून जाते....
To Be or not to be
That is the Question
जगावं की मरावं ? हा एकच सवाल
या दुनियेच्या उकिरडयावर... खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन
जगावं बेशरम लाचार आनंदानं,
की फेकून द्यावं देहाचं लक्तर,
त्यात गुंडाळल्या जाणिवेच्या यातनेसह
मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये ?
आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं माझा, तूझा आणि त्याचाही.
मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा,
की नंतर येणार्या निद्रेला नसावं जागृतीचा किनारा कधीही.
पण त्या निद्रेला ही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर,
तर - तर इथंच मेख आहे.
नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो हे जूने जागेपण,
प्रेताच्या निर्जिवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभारयात असलेल्या सत्वाची विटंबना...
आणि अखेर करूणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकराच्याच दाराशी !!
विधात्या तू इतका कठोर का झालास ?
एका बाजूला,
आम्ही ज्यानां जन्मं दिला ते आम्हाला विसरतात
आणि दुसर्या बाजूला...
ज्यानं आम्हाला जन्म दिला तो... तु ही आम्हाला विसरतोस,
मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करूणाकरा,
आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायांवर डोकं आदाळायचं !
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
🔖 मराठी राजभाषा दिन उपयुक्त माहिती
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ २७-फेब्रुवारी-मराठी-राजभाषा-दिन
↪️ कुसुमाग्रज-वि-वा-शिरवाडकर-परिचय
↪️ कुसुमाग्रज-साहित्य-निर्मिती
🔖 राष्ट्रीय विज्ञान दिन उपयुक्त माहिती
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ २८ फेब्रुवारी-राष्ट्रीय-विज्ञान-दिन
↪️ नोबेल-विजेते-सी-वी-रमन-परिचय
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻