मराठी भाषा घोषवाक्ये | राजभाषा दिन | Marathi Bhasha Ghoshawakye

 मराठी भाषा आहे सक्षम,

    करण्या संस्कृतीचे रक्षण

• मराठीशी करता मैत्री,

    ज्ञानाची मिळेल खात्री

मराठी भाषा गोड,

    वाढवी शिक्षणाची ओढ

 मराठी वाढविते ज्ञान,

    मराठी उंचावते जीवनमान

 मराठी ज्ञानाचा कल्पतरू,

    हात मराठीचा हाती धरू

 मराठी वाचन, मराठी श्रवण,

    मराठी आमुचे तन मन धन

 मराठीला देऊनिया आकार,

    कुसुमाग्रजांचे स्वप्न करू साकार

 मराठी भाषा पोहचवू घरोघरी,

    नांदेल सर्वत्र ज्ञानाची पंढरी

 मराठी भाषा वाढविते ज्ञान,

    मराठीच देते जीवनी सन्मान

 मराठी भाषा असे खास,

    मराठी असे आमुचा श्वास

 मराठी मनाचा एकच नारा,

    मनी मराठीचा ध्यास धरा

 माझी अस्मिता - तुमची अस्मिता,

    आपली मराठी भाषा

 माझ्या मराठीचा जागर जागर,

    भरू ज्ञानाची घागर घागर

 ध्वज माय मराठीचा,

    उंच धरारे, उंच धरा रे

 आण बाण आणि शान,

    मराठी असे आपुला पंचप्राण

 व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास,

    चला धरूया मराठीची कास

 धरता मराठीचा ध्यास,

    मराठीचा होईल विकास.

 ध्यास मराठीचा मनी सजवा,

    मराठीची गोडी भावी पिढीत रुजवा

 मराठी असे आमुचा अभिमान,

    मराठी अवघ्या महाराष्ट्राची शान

 मराठी हीच मातृभाषा,

    मराठी हीच ज्ञानभाषा

 ध्यास मराठीचा मनी रुजवा,

    मराठी अस्मिता मनी सजवा

 मराठी भाषा नांदे जेथे,

    साहित्यविश्व प्रसवे तेथे

 मराठी भाषा नांदे जिथे,

    ज्ञानास काय ऊणे तिथे

 ध्यास मराठी मनी रुजवा,

    स्वप्न मराठीचेच मनी सजवा

 मराठी माझा अभिमान,

    मराठी माझा स्वाभिमान

 विकासाचे प्रगतीचे महाद्वार,

    मराठीचा झेंडा अटकेपार

 मी मराठी भाषा मराठी,

    प्रत्येक हृदयी आम्ही जपतो मराठी

 साहित्यात मराठीचा अनमोल वाटा,

    नानाविध असती मराठीच्या छटा

 मराठीचा बोलबाला आसमंतात दुमदुमु द्या,

    मायबोली मराठीत मराठी मनामनात रमू द्या

 परदेशात वाजती मराठीचे चौघडे,

    मराठीचे विश्व वसे जगती चोहीकडे

  निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक  

  Copyright Disclaimer  

वरील माहिती  स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

🔖 इतरही उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २७-फेब्रुवारी-मराठी-राजभाषा-दिन

↪️  कुसुमाग्रज-वि-वा-शिरवाडकर-परिचय

↪️  कुसुमाग्रज-जीवन-प्रवास

↪️  कुसुमाग्रज-साहित्य-निर्मिती

↪️  जन्म-मराठी-भाषेचा

↪️  मराठीची-बोलू-कौतुके

↪️  माझी-मातृभाषा-मराठी

↪️  मराठी-आमुची-मायबोली

↪️  मराठी-भाषा-गीत-डाऊनलोड

🔖 राष्ट्रीय विज्ञान दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २८ फेब्रुवारी-राष्ट्रीय-विज्ञान-दिन

↪️  नोबेल-विजेते-सी-वी-रमन-परिचय

↪️  विज्ञान-म्हणजे-काय?

↪️  विज्ञान-हे-वरदानच

↪️  विज्ञानाची-वैशिष्ट्ये

↪️  MP3-विज्ञान-गीत-डाऊनलोड

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

أحدث أقدم