शिवाजी महाराज मराठी भाषण | शिवाजी महाराज मराठी माहिती | शिवाजी महाराज छोटी भाषणे | Shivaji Maharaj Marathi Speech
शिवाजी महाराज मराठी माहिती

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो, प्रथम छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा ! 

छत्रपती शिवरायांचा जन्म पुणे जिल्हयातील शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजामातेच्या पोटी झाला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी हे ठेवण्यात आले.

बालपणी शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना नेहमी वाटत असे. वयाच्या सातव्या वर्षापासून शिवरायांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. अनेक विद्या त्यांनी पारंगत केल्या. १६४५ मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली.

अनेक किल्ले एकामागून एक जिंकून शिवरायांनी स्वराज्य उभे केले. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळावे, स्वराज्य भक्कम व्हावे म्हणून १६७४ साली शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.

१६३०-१६८० या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत महान कामागरी बजाबून, अखेर ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. रयतेला पोरके करून, रयतेचा जाणता राजा देवाघरी गेला. त्रिवार मुजरा माझा छत्रपती शिवाजी राजांना !! 

जय भवानी, जय शिवाजी !!


Copyright Disclaimer : वरील साहित्य स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने तयार करण्यात आले आहे. ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

इतरही शिवजयंती उपयुक्त माहिती 

शीर्षकावर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  सूत्रसंचालन-निर्मिती-गिरीश दारुंटे

↪️  Audio Flipbook-गिरीश दारुंटे

↪️  शिवजयंती प्रास्ताविक-गिरीश दारुंटे

↪️  चारोळ्या-निर्मिती-गिरीश दारुंटे

↪️  शिवस्तुती-प्रेरणामंत्र

↪️  शिवजयंती-पोवाडा

↪️  शिवजयंती-फलक लेखन

🎙️ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे

↪️  छत्रपती शिवरायांचे बालपण

↪️  शिवछत्रपती - स्वराज्याचे दैवत

↪️  युगपुरुष शिवाजी महाराज

↪️  शिवछत्रपती - रयतेचे राजे

↪️  शिवछत्रपती की जीवनी-हिंदी

↪️  महानयोद्धे शिवछत्रपती-इंग्रजी 1

↪️  अद्वितीय राजा-इंग्रजी 2

↪️  राजे शिवाजी भोसले-इंग्रजी 3


 📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

أحدث أقدم