क्रांतिकारक सुखदेव रामलाल थापर
१५ मे १९०७ - २३ मार्च १९३१
भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सुखदेव थापर यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी लायलपूर ( लुधियाना) येथे झाला. हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. यांचा इ.स. १९२८ मध्ये जे.पी. सॉण्डर्स यास यमसदनी धाडण्याच्या कटात सहभाग होता.
क्रांतिकार्यात सहभाग : सुखदेव हिंदुस्थान सोशियालिस्ट रिपब्लिक असोसियेशनमधील एक नेता म्हणून त्यांच्या चळवळीत सक्रिय सहभागी होता. त्याने भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तसेच रशियन राज्यक्रांती व जागतिक क्रांतिकारी साहित्याची छाननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असे म्हणतात. भगत सिंग, कॉम्रेड राम चंद्र व भगवती सिंग व्होरा यांच्या बरोबर त्याने लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली. तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय करणे, शास्त्रीय विचारपद्धतीचा अवलंब करणे, जातिव्यवस्थेविरुद्ध-अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणे हे या संघटेनेचे मुख्य उद्दिष्ट होते. भगतसिंग यांनी असेंम्बलीमध्ये बाँब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापेसत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले होते. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग, राजगुरूंबरोबर सुखदेव देखील २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी गेले.
सुखदेववर पंडित राम प्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता. सुखदेवने इ.स. १९२९ मध्ये तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकीविरुद्ध तुरुंग उपोषणातही भाग घेतला होता. त्याचे फाशीपूर्वी महात्मा गांधीना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालींवर प्रकाश टाकते. त्याच्या कार्यामुळे पंजाबमधील लुधियाना शहारातील त्याच्या शाळेचे नाव अमर झाले.
शिक्षा आणि फाशी : भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ.स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह काराग्रहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोरपासून अंदाजे ५० मैल दूर हुसैनीवाला या ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला. ते मृतदेह त्वरित गाडता यावेत म्हणून त्याचे कापून लहान लहान तुकडे करण्यात आले.
PDF डाऊनलोड करा.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
शहीद दिन उपयुक्त भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎙️ शहीद-भगतसिंग-इंग्रजी-माहिती
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻