स्वच्छ भारत...
चला करुया आपण परिसराची स्वछता,
घेऊया न कचरा करण्याची दक्षता.
ठेऊया परिसर नेहमी योग्य,
तरच मिळेल निरोगी आरोग्य.
खरच होईल का परिसर स्वछ?
ज्यांच्या मनात आहे विचार तुच्छ !
आधी करुया स्वच्छता मनाची,
तरच होईल निर्मिती स्वच्छ व सुंदर समाजाची .
करुया केरकचरा व पलास्टिकची विल्हेवाट,
तरच मिळेल स्वच्छतेला मोकळीक वाट.
सुरु झालय स्वच्छतेच आशादायी अभियान,
होतय हळुहळु कमी कचरयाच प्रमाण.
चला घेऊया झाडू प्रत्येकाच्या हाती ,
करुया आपल्यया परिसराची प्रगती.
तरच होईल सशक्त भारताची निर्मिती,
कारण स्वच्छताच हिच खरी संपति !!!
- अक्षय महाजन
स्वच्छता अभियान...
सध्या आपल्या देशात
वाहताहेत स्वच्छतेचे वारे
हाती घेवून झाडू
परिसर झाडू लागले सारे
आधी गांधी… आता मोदी
दिला स्वच्छतेचा मंत्र
देशासाठी काम करा
या सर्वजण एकत्र
मग नेते अभिनेत्यांपासून
कॉर्पोरेट लोकांपर्यंत
राबविले अभियान सर्वांनी
केवळ फोटो काढेपर्यंत
आम जनता देखील तेव्हा
देवू लागली पोज
प्रकाशझोत पडता कॅमेराचा
परिसर पडू लागला ओस
चार दिवस नवलाईचे
म्हणतात तसेच झाले
पूर्वीसारखे ढीग कचऱ्याचे
पुन्हा तयार झाले
महत्व स्वच्छतेचे आम्हा
सांगून गाडगेबाबाही गेले
खरे महान कार्य तर
तेच करून गेले
‘हि भूमी’ ज्यांची म्हणवतो
त्यांची शिकवणच सारे विसरलो
वैराग्यमुर्तींच्या या कार्याला
आपणच पार विसरलो
तेव्हा मित्रांनो...
केवळ अभियान राबवून
नाही होत स्वच्छता साध्य
प्रत्येकानेच अंगी बाणावे
कर्तव्य मनी हे आद्य
- भालचंद्र
स्वच्छतेची नाती...
झाडीला रस्ता
खराटा घेऊनी हाती
मनाच्या स्वच्छतेवर
किर्तनातून गाजवल्या राती
समाज मनात पेटविल्या
स्वच्छतेच्या ज्योती
तुडविल्या समाजाच्या
जुनाट रीती भाती
नाही होऊ दिली
समाजाची माती
ठेवून फुटके मडके माथी
घेऊन झाडू हाती
प्रबोधनास दिली गती
माणसाशी जोडीली अतूट नाती
आज आठवूनी तुम्हां
सारे स्वच्छतेची गाणी गाती
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/