शिवाजी महाराज मराठी भाषण | शिवाजी महाराज मराठी माहिती | शिवाजी महाराज छोटी भाषणे | Shivaji Maharaj Marathi Speech
शिवाजी महाराज मराठी माहिती

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, आज मी तुमच्यासमोर एक महान युगपूरूष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणार आहे.

हर हर महादेव आवाज सुटला,

मुघलांच्या कपाळावर घाम फुटला l

मावळ्यांच्या झळकल्या लख्ख तलवारी,

मुघल भीतीने पळतील माघारी ll

मनात तर सतत एकच विचार येतो, शिवबा तुम्ही अजून १० वर्षे जगला असता तर नक्कीच मुघलांनी सुध्दा भगवाच फडकवला असता...

जगणारे ते मावळे होते,

जगवणारा तो महाराष्ट्र होता l

पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून,

रयतेची मायेनी काळजी घेणारा,

तो माझा शिवबा होता !!

शिवराय जिजाऊंच्या सानिध्यात शूरवीरांच्या गोष्टी ऐकत तुम्ही मोठे झालात. मावळ्यांच्या साथीने पराक्रम गाजवतअनेक किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तुम्ही प्रत्यक्षात साकारले. गनिमी काव्याचा अवलंब करत शिवबा तुम्ही अनेक मोहिम फत्ते केल्या. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, नेताजी पालकर, जिवा महाला यांसारख्या अनेक वीरांनी हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केली नाही.

शिवबा तुम्ही परस्त्रियांनाही माता, बहिणीसमान वागणूक दिली. जात, पात, धर्म असा कुठलाही भेदभाव केला नाही.काही लोक चारित्र्यवान असतात, पण ते पराक्रमी असतीलच असे नाही. काही लोक पराक्रमी असतात, पण ते चारित्र्यवान असतीलच असे नाही. पण जो माणूस चारित्र्यवान आहे आणि पराकोटीचा पराक्रमी आहे असा महापूरूष शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही.

रयतेसाठी तो जन्मभर झिजला,

रक्षणार्थ तयांच्या गडकोटी वसला l

मानवतेच्या या झऱ्यापुढे काळही थिजला,

असा शूर शिवबा माझा रायगडी निजला ll

१६३०-१६८० या पन्नास वर्षाच्या कारकीर्दीत असीम कामगिरी बजावत अखेर ३ एप्रिल १६८० रोजीशिवराय तुमच्या रूपाने रयतेचा वाली गेला.आदर्श पुत्र, कुशल संघटक, सावध नेता, दुर्जनांचा कर्दनकाळ,सज्जनांचा कैवारी, जाणता राजा, लोककल्याणकारी प्रशासक आणि एका नव्या युगाचा निर्माता... असे शिवबा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. यावरून पुन्हा म्हणावेसे वाटते...

शिवरायांचे आठवावे रूप,

शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी ॥

जय भवानी, जय शिवाजी ll


Copyright Disclaimer : वरील साहित्य स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने तयार करण्यात आले आहे. ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

इतरही शिवजयंती उपयुक्त माहिती 

शीर्षकावर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  सूत्रसंचालन-निर्मिती-गिरीश दारुंटे

↪️  Audio Flipbook-गिरीश दारुंटे

↪️  शिवजयंती प्रास्ताविक-गिरीश दारुंटे

↪️  चारोळ्या-निर्मिती-गिरीश दारुंटे

↪️  शिवस्तुती-प्रेरणामंत्र

↪️  शिवजयंती-पोवाडा

↪️  शिवजयंती-फलक लेखन

🎙️ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे

↪️  छत्रपती शिवरायांचे बालपण

↪️  शिवछत्रपती - स्वराज्याचे दैवत

↪️  युगपुरुष शिवाजी महाराज

↪️  शिवछत्रपती - रयतेचे राजे

↪️  शिवछत्रपती की जीवनी-हिंदी

↪️  महानयोद्धे शिवछत्रपती-इंग्रजी 1

↪️  अद्वितीय राजा-इंग्रजी 2

↪️  राजे शिवाजी भोसले-इंग्रजी 3


 📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

أحدث أقدم