थोर समाजसेविका रमाबाई रानडे
२५ जानेवारी १८६२ रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावात रमाबाईंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव कुर्लेकर ते देवराष्ट्रे या गावाचे जहागीरदार होते.
रमाबाई भावंडांमध्ये लहान असल्याने सर्वांच्या लाडक्या होत्या. न्यायमुर्ती महादेव रानडे यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला, त्यावेळी त्यांचे वय फक्त अकरा वर्षांचे होते. विवाह नंतर त्यांनी आपल्या पतीच्या आग्रहाखातर इंग्रजी भाषा शिकून घेतली. त्या दररोज वर्तमानपत्रांचे आणि पुस्तकांचे वाचनही करत असत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. ज्ञानात भर पडली.
१८८० नंतर सार्वजनिक व सामाजिक कार्यात त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. मुंबईला प्रार्थना समाजाच्या स्त्रीयांसाठी आयोजित केलेल्या सभांना त्या जात असत. १८८२ मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली. रमाबाई महिला समाजाच्या सभासद झाल्या.
पुढे त्यांनी सार्वजनिक कार्य नेटाने चालूच ठेवले. १६ जानेवारी १९०१ मध्ये न्यायमूर्ती रानडे यांचे निधन झाले. त्या काळी त्यांनी आपले सामाजिक कार्य काही वेळ थांबवले होते. परंतु नंतर १९०४ मध्ये त्यांनी मुंबई येथे स्त्रियांची पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित केली. त्या परिषदेच्या अध्यक्ष स्वतः रमाबाई होत्या. पुढे आपल्या घरात त्यांनी पुणे येथे पुणे सेवासदन सुरू केले. त्या काळी स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी लढा दिला.
"आमच्या आयुष्यातील काही आठवणी..." हे रमाबाईंचे आत्मचरित्र होय. हे आत्मचरित्र म्हणजे स्त्रीचे पहिले आत्मचरित्र होय.
भारत सरकारने १९१३ मध्ये कैसर-ए-हिंद या किताबाने त्यांचा गौरव केला. २६ एप्रिल १९२४ रोजी या थोर समाजसेविकेचे दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या त्यागास, थोर कार्यास व त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
🔖 जागतिक महिला दिन उपयुक्त भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन
↪️ जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक
↪️ ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण
↪️ महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण
↪️ लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण
कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻