स्वच्छतेचे महत्त्व 1
आयुष्यात स्वच्छतेचे महत्त्व किती आहे हे तुम्हाला अनेक वेळा सांगितले जाते. तुम्हीही स्वतः या गोष्टींचा अनुभव घेतला असेल. देहाची स्वच्छता ठेवली की मन प्रसन्न होते, घर, परिसर स्वच्छ ठेवली की मन प्रसन्न होते. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. त्यामुळे रोगराई पसरत नाही हे तुम्ही विज्ञानाच्या पुस्तकात अनेकदा वाचले असेल.
संत गाडगेबाबा हे स्वच्छतेचे पुरस्कर्ते होते. ते स्वतः हातात झाडू घेऊन रस्ता स्वच्छ करत असत. त्यामुळे लोकांना आपोआप शिकवण मिळायची आणि लोक त्यांचा आदर करायचे. संत गाडगेबाबा पंढरपूरला जात पण ते कधीही मंदिरात जात नसत. एकदा एका शिष्याने त्यांना विचारले 'बाबा, आपण मंदिरामध्ये कधीच का येत नाही?' त्यावर गाडगेबाबांनी विचारले 'तिथे काय आहे?'
शिष्य गोंधळून म्हणाला काय म्हणजे? तिथे विठोबाची मुर्ती आहे!'
त्यावर गाडगेबाबा म्हणाले 'तिथे देवळात नुसते कमरेवर हात ठेवून काय करतोय तो? त्याला म्हणावे जरा बाहेर येऊन बघ. तुझ्याच भक्तांनी मंदिराच्या परिसरात किती घाण केली आहे. त्यांना जरा स्वच्छता राखण्याची बुद्धी दे! त्यामुळे त्यांचे आणि समाजाचेही आरोग्य चांगले राहील! तुला सांगतो, विठ्ठलालाही या सार्या घाणीचा बराच त्रास होत असेल. मी मंदिराची स्वच्छता करतो आहे म्हणजे त्याचीच भक्ती करतो आहे असे समजतो! त्याने भक्तांना या परिसरातल्या घाणीबरोबर मनातलीही घाण काढून टाकण्याची बुद्धी घ्यावी!'
गाडगेबाबांचे हे उत्तर शिष्याला एकदम पटले. त्याक्षणी विठ्ठलाची खरी भक्ती तर संत गाडगेबाबाच करत आहेत असे त्याला वाटले. गाडगेबाबा स्वच्छता हाच परमेश्वर मानत असतं. आजही 'संत गाडगेबाबा अभियाना'तर्फे त्यांच्या या तत्त्वाचा प्रचार केला जातो.
लेखन : वैशाली जाधव
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/