स्वच्छतेचे महत्त्व | स्वच्छता पंधरवडा माहिती | स्वच्छ भारत अभियान माहिती | स्वच्छता अभियान | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

DOWNLOAD PDF HERE

स्वच्छतेचे महत्त्व 2

विश्वची माझे घर असे संत मंडळी बोलून गेली आहेत . आपण स्वतः ते विश्व या आयुष्याच्या प्रवासात आपले कुटुंब, घर, शेजारी पाजारी, परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश या सार्यांशी आपली व्यक्ती म्हणून देशाचा जबाबदार नागरीक म्हणून बांधिलकी असते. 'स्वच्छता' ही अशीच वैयक्तिकते कडून सामाजिकतेकडे नेणारी गोष्ट आहे.

स्वच्छतेचे बाळकडू बालपणापासून आपणास मिळत आले, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी जोपासत आपण शाळा शिकलो, मोठे झालो. कुटुंबातून शिक्षकांकडून, पाठ्यपुस्तकातून स्वच्छता का करायची हे ऐकत आलो आणि ते पटणारेच होते.  सकाळच्या रम्य प्रहरी शरीराची घराची परिसराची स्वच्छता झाली की प्रसन्न, वाटते. या प्रसन्नतेत देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले वा घरच्याच देव्हार्यासमोर प्रार्थना श्लोक म्हटले की मनही ताजे तवाने होऊन जाते. मनातील नकारात्मक विचारांची जागा सुविचार कधी घेतात कळतही नाही. आणि मग जाणीव होते.

स्वच्छता म्हणजे नेमके काय याची. शरीरातील, मनातील घरातील नको असणारे निरूपयोगी, अडगळ, अस्वच्छ असे सारे दूर केल्याने योग्य विल्हेवाट लावल्याने मंगलमय असे वातावरण तयार होते. ज्याची सर्व प्राणी मात्रांना गरज आहे.

देह देवाचे मंदीर..आत्मा एक पंढरपूर हे खरे आहे. जसे देहामधे परमेश्वराचे अस्तित्व आहे तसेच ते चरचरात भरून उरले आहे मग आपण या सृष्टीची किती स्वच्छता ठेवायला हवी हे वेगळे सांगायला नको.

स्वच्छ शरीरामुळे व स्वच्छतेच्या सवयींमुळे उत्तम आरोग्याचा लाभ होतो हे वैयक्तिक आरोग्य का बरोबरच सामाजिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे. कचर्याची योग्यप्रकारे सुका कचरा ओला कचरा अशी विभागणी करण्याची सवयही अंगीकारणे गरजेचे आहे. डंपिंग ग्राउंडची समस्या उग्र रूप धारण करते आहे. हे सामाजिक भान आपल्यात जागवणे ही काळाची गरज आहे. आज ई कचरा ही सुद्धा दिवसा गणिक वाढणारी समस्या ठरते आहे याकडेही समाजाचे लक्ष वेधणे व स्वच्छतेच्या प्रश्नाकडे अधिक सजगतेने पहाणे गरजेचे आहे.

मी माझ्यापुरते पाहून चालणार नाही. देशाच्या स्वच्छता, अभियानाचे आपण सारे जण अग्रदूत होउन काम केले तर स्वच्छ गाव, स्वछ देश हे स्वप्न सत्यात उतरेल नाहीतर माझ्या एकट्याने स्वच्छतेचे महत्व जाणून काय होणार? हा नकारात्मक विचार झटकून स्वच्छतेची क्रांती लाट यायला हवी. विज्ञानयुगात स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणार्या अनेक बातम्या, शोध, जाहिराती प्रसारीत होतात. अनेक रोगजंतूचा प्रसार रोखण्यासाठी रोग बरे होण्यासाठी औषधांबरोबरच आरोग्यदायी वातावरणाची नितांत आवश्यकता आहे. सत्यम शिवम सुंदरम, अशी वाटचाल करायची तर स्वच्छ शरीर व स्वच्छ सुंदर मन घडवायलाच हवे. ज्याची सुरूवात स्वतापासून करूया तरच स्वताची कर्तव्ये पार पाडण्यासाठी योग्य उर्जेची प्राप्ती होईल. निसर्ग सुंदर आहे, आयुष्य सुंदर आहे.

चला तर मग हाती घेऊन हात 

अस्वच्छतेवर करू मात 

सुविचारांना देऊ साथ 

आरोग्यदायी उगवेल प्रभात

लेखन : विद्या प्रभु, मुंबई

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

------------------------------
इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🇮🇳  स्वच्छ भारताच्या वाटेवर

🇮🇳  स्वच्छता अभियान घोषवाक्ये

🇮🇳  स्वच्छता अभियान कविता

🇮🇳  स्वच्छता अभियान शपथ 2022

🇮🇳  स्वच्छता अभियान शपथ

🇮🇳  स्वच्छतेची महती

🇮🇳  स्वच्छतेचे महत्त्व 1

🇮🇳  स्वच्छतेचे महत्त्व 2

🇮🇳  स्वच्छतेचे अभियान संदेश

------------------------------

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

------------------------------

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

أحدث أقدم