अहिल्याबाई होळकर | जागतिक महिला दिन माहिती | महिला दिन भाषणे | International Women's Day Speech | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

अहिल्याबाई होळकर

मी अबला नाही, सबला आहे... हे आपल्या कर्तृत्वातून दाखवून देणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांना मनोभावे वंदन! अहिल्याबाई राज्यकारभारात करारी, व्यवहारदक्ष, धार्मिक, दानशूर म्हणून आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तसेच राजमाता म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म  १८ मे १७२५ मध्ये नगर जिल्ह्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे विनम्र व धार्मिक वृत्तीचे होते.

वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह खंडोजी होळकर यांच्या बरोबर झाला. विवाहानंतर त्या मध्यप्रदेशातील इंदूर येथे सासरी गेल्या. त्यांना मालोजी व मुक्ता अशी दोन अपत्ये होती. परंतु सन १७५४ मध्ये कुंभारीच्या लढाईत  खंडोरावांचे निधन झाले. अहिल्याबाई विधवा झाल्या त्याकाळी सती जाण्याची पद्धत होती म्हणून अहिल्याबाईंनी सुद्धा सती जाण्याची तयारी केली. परंतु सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना विनंती केली की आम्ही तुझ्यावर अवलंबून आहोत. मुलं अजून अज्ञान आहेत. आम्हालाच नव्हे तर राज्याला सुद्धा तुझी गरज आहे. त्यामुळे राज्यकारभार हा तुलाच सांभाळावा लागेल! अहिल्याबाईंना मल्हाररावांचे हे म्हणणे पटले आणि त्यांनी कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली.

अहिल्याबाईनी मराठी, मोडी भाषा शिकल्या. लिहायला, वाचायला शिकल्या. राज्यकारभार, वसुलीत शेतसारा या पद्धती बद्दल करून घेतली. सैन्य पोटावर चालते हे त्यांनी ओळखले होते, म्हणुनच त्यांनी सैनिकांना सोयीसवलती देऊन त्यांच्या मध्ये मातृभूमि बद्दल प्रेम  निर्माण करून त्यांचा विश्वास मिळवला होता. सैनिकांमध्ये आदरयुक्त भीती निर्माण केली. त्यांनी स्वतः घोडेस्वारीचे व नेमबाजीचे शिक्षण घेतले.

पुढे मल्हारराव होळकर त्यांचे सासरे यांचे १७६६ मध्ये निधन झाले. तेव्हा मात्र अहिल्याबाई होळकर या एकाकी पडल्या एकट्या पडल्या कारण त्यांना सासर्‍यांचा मोठा आधार होता.

प्रजा हीच आपली संपत्ती आहे, असे अहिल्याबाईने मानले होते आणि म्हणूनच त्यांनी संपूर्ण राज्याचे पालकत्व घेतले. त्यांना रामराज्य निर्माण करायचे होते त्यासाठी त्यांनी आपली सगळी दुःख बाजूला ठेवली आणि आपल्या कारकिर्दीत समाजासाठी आणि समाजाच्या सुख सोयींसाठी कामे केली. त्यांनी इंदूरहून आपली राजधानी माहेश्वरला वसवली. त्यांनी नर्मदा नदीच्या तीरावर एक भक्कम आणि सुंदर किल्ला बांधला हा किल्ला म्हणजे अठराव्या शतकातील उत्तम वास्तुकलेचा नमुनाच होय.

अहिल्याबाईंचा कारभार पारदर्शक होता प्रजेवर त्यांचे खूप प्रेम होते अहिल्याबाई या स्वतः खंबीर स्वाभिमानी तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या होत्या.

इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सर्व राज्यांना एकत्र करणारी व उघडपणे संघर्ष करणारी अहिल्याबाई ही पहिली व्यक्ती असल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. अनेक घाट बांधले, धर्मशाळा, दवाखाने , बांधले गरिबांसाठी अन्नछत्रे सुरू केली, मोठमोठी मंदिरे बांधली, हिमालयापासून दक्षिण भारतात सर्वत्र मंदिरांचा जीर्णोद्धार केला. मंदिरांसोबतच मशिदी सुद्धा बांधल्या. अशा या थोर कर्तृत्ववान, प्रजाहितदक्ष अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!!

निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

🔖 जागतिक महिला  दिन उपयुक्त भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन 

↪️  जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक

↪️  ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण

↪️  आधुनिक-स्त्रीची-रूपे-भाषण

↪️  महिला-सबलीकरण-भाषण

↪️  स्त्री-शक्तीला-सलाम-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-घोषवाक्ये

↪️  जागतिक-महिला-दिन-शायरी

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण

↪️  महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण

↪️  लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण

कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎙️जागतिक महिला दिन भाषण

🎙️ राजमाता जिजाऊ माँसाहेब 

🎙️ राजमाता अहिल्याबाई होळकर

🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

🎙️ भारतरत्न इंदिरा गांधी

🎙️ डॉ. आनंदीबाई जोशी

🎙️ समाजसेविका रमाबाई रानडे

🎙️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर 

🎙️ धावपटू कविता राऊत

🎙️ फ्लाईंग राणी हिमा दास

🎙️ कल्पना चावला मराठी

🎙️ कल्पना चावला इंग्रजी

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

أحدث أقدم