क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजनवर्ग, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी महिला दिनाच्या निमित्ताने आपणासमोर, भारताच्या पहिल्या आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जे दोन शब्द सांगत आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती...
आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करता आहेत. भारतीय स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाट आहे. त्यांच्या पतीसह त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारणेचे काम करण्यात आयुष्य खर्ची केले.
व्यथा समाजाची ज्योतीबा-सावित्रीने जाणली
स्त्रियांच्या शिक्षणाची ज्ञानगंगा दारोदारी आणली
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्हयातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला, त्यावेळी त्या निरक्षर होत्या. विवाहानंतर फूलेंनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवले. त्या काळी चूल आणि मूल हेच स्त्रीच क्षेत्र समजले जायचे, मुलींना शाळेत पाठवले जात नसे. शिक्षणाचा अधिकार मुलींना व स्त्रियांना नव्हता. पण जिद्दी सावित्रीबाईनी यास न जुमानता शिक्षण घेतले. ज्योतिबांच्या साथीने सन १९४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मूलींसाठी पहिली शाळा सुरु केली. अनेकांनी विरोध केला पण सावित्रीबाई, ज्योतिबा डगमगले नाहीत. शाळेत जात असताना लोकांनी दगडफेक केली, शेणही मारले, तरीपण त्या मागे हटल्या नाहीत. सावित्रीबाईनी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून क्रांती घडवली. म्हणून सावित्रीबाईचा जन्मदिवस जन्मदिवस बालिका दिन तसेच महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. शेवटी मला हेच म्हणावेसे वाटते की...
पार करूनी अनंत अडथळे
शिकवलेस तू स्त्रियांना
नतमस्तक होतो आम्ही
सावित्रीमाई धोरवी तुझी गातांना
जय हिंद, जय महाराष्ट्र !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
🔖 जागतिक महिला दिन उपयुक्त भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन
↪️ जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक
↪️ ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण
↪️ महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण
↪️ लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण
कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻