जंगलाचा राजा निळा लांडगा | मराठी बोधकथा | सुंदर बोधकथा | छोट्या बोधकथा | Marathi Bodhakatha | Nila Landga | Marathi Short Stories | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

जंगलाचा राजा निळा लांडगा

एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत  होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करीत होती. जीवाच्या आकांताने धावणारा लांडगा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोहचला. ते  घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या परटाचे होते. त्या परटाने  कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी एकत्र करून ठेवले होते.

लांडगा परीटाच्या घरात पोहचला आणि त्याने सरळ खिडकीतून घरात उडी मारली. लांडग्याची उडी नेमकी निळीच्या भांड्यात पडली. लांडगा त्या भांड्यात लपून बसला. पाठलाग करणारी कुत्री घराबाहेर घुटमळली आणि थोड्या वेळाने निघून गेली.

सकाळ होताच लांडगा घरा  बाहेर पडला आणि जंगलात पळून आला. आपला रंग निळा झाला आहे हे त्याला माहितच नव्हते. लांडगा जंगलात पोहताच त्याला बघून अनेक प्राणी पळून गेले. निळ्या रंगाचा प्राणी ते प्रथमच  बघत होते. लांडग्याला काहीच समजत नव्हते कि हे  सगळे प्राणी आपल्याला का घाबरत आहेत ?

नदीजवळ जाताच लांडग्याने स्वत:चे प्रतिबिंब पाण्यात बघितले त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वत:चे निळे प्रतिबिंब बघून त्याला समजले कि जंगलातील प्राणी आपणास का घाबरत आहेत ते..!

सर्व घाबरलेल्या प्राण्याचा लांडगा राजा झाला आता त्याचे दिवस मजेत चालले होते. एके रात्री जंगलातले काही लांडगे एकत्र आले आणि जोरजोरात आरोळ्या ठोकू लागले. 'निळा लांडगा' स्वत:चे राजेपण विसरून ओरडू लागला. निळ्या लांडग्याचा आवाज ऐकताच जंगलातील सर्व प्राण्यांना त्याचे खरे रूप कळले. आपण मूर्ख बनलो हे  प्राण्यांना कळले सर्व प्राणी एकत्र आले आणि त्यांनी त्या लांडग्याला जंगलाबाहेर हुसकून लावले. 

 तात्पर्य : असत्य जास्त काळ टिकत नाही.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

इतरही रंजक बोधकथा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📘 एक गरुड आणि घुबड

📙 सवयीचा गुलाम पोपट

📗 कुत्र्याची दूरदृष्टी

📕 हरीण आणि कोल्हा

📘 गर्विष्ठ मेणबत्ती

📙 अपमान आणि उपकार

📗 म्हातारी आणि वैद्य

📕 सेवा हाच धर्म

📘 अति लोभ नसावा

📙 कष्टाची कमाई

📗 पोपटपंची विद्या

📕 गर्विष्ठ मोर

📘 घोड्याला अद्दल घडली

📙 कोल्ह्याची फजिती

📗 पर्वत आणि उंदीर

📕 लांडगा आला रे आला

📘 जंगलाचा राजा लांडगा

📙 वाईट संगतीचे परिणाम

📗 स्वार्थी मांजर

📕 मुंगी व कोशातील किडा

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

أحدث أقدم