स्त्री भ्रूणहत्या एक समस्या | जागतिक महिला दिन माहिती | महिला दिन भाषणे | International Women's Day Speech | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

  स्त्री शक्तीला सलाम  

स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे.

भारतीय तत्वाज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची.

स्त्री आणि पुरूष यांच्यात केवळ शरीरभेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील, श्रध्दावंत आहे, तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरुषाचे लक्ष्य मात्र भौतिकतेकडे, जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते.

राजा जनकाच्या राजसभेत याज्ञवलक्याला कसे प्रश्न विचारण्यात आले होते. ते तुम्हाला आठवते का ? त्यांना प्रश्न विचारण्यापैकी प्रमुख होती वाचवनवी नामक एक कुमारी मोठी वाक्पटू होती. त्या काळी अशा स्त्रियांना ब्रह्मवादिनी म्हणत. एखाद्या कुशल धनुर्धराच्या हातात चमकणारे दोन बाण असावेत तसे माझे प्रश्न आहेत असे ती म्हणाली. त्या ठिकाणी तिच्या स्त्रीत्वासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही.

तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरुषांप्रमाणे उक्ते मिळाले नाही. गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीचा थोड प्रवास १९५० मध्ये प्रेम माथुर यांना भारतातील पहिल्या व्यावसायीक महिला वैमानिक होण्याचा मान, १९५२ च्या ऑलिपिंक स्पर्धामध्ये पुरुष व महिलांना एकत्र खेळण्याची संधी, भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, सुचेता कृपलानी यांना भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान, भारतीय पोलिस सेवेत अधिकारी पदावर किरण बेदी यांची निवड पोलिस सेवेत अधिकारी पदावर दाखल झालेल्या पहिल्या महिला, मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, भारतीय सैन्य दलात महिलांचा प्रवेश, भारताच्या राष्ट्रपती पदी महिलेची निवड प्रतिभाताई पाटिल, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब, भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण.

झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीरा बोरवणकर, सुनिता विल्यम्स, अंजु जॉर्ज, कल्पना चावला, सानिया मिर्झा या महिला आपापल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल याबरोबर, रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणे, बसे कंडक्टर, पत्रकारिता, फायरब्रिगेड ही क्षेत्रे सुद्धा महिलांनी काबीज केली आहेत.

सध्या भारतात मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या महिला आहेत. आताच राष्ट्रकूल स्पर्धामध्ये भारतीय महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे. सध्या राष्ट्रीय राजकारणांत महिलांची संख्या नगण्य आहे. आर्थिक क्षेत्रातही अनेक महिला मोठ्या पदांवर कार्यरत आहे. संशोधन क्षेत्रातही महिलांची संख्या वाढतेय ही चांगली गोष्ट आहे.

त्याचप्रमाणे समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात पडते असं म्हणतात. चित्रपट हे माध्यम जनसामान्यांवर प्रभाव टाकतं. काळाबरोबर चित्रपटातील नायिका बदलत गेली. विशेष म्हणजे चित्रपटातील हे बदल समाजामध्ये स्त्रीनं घडवून आणलेल्या बदलांच प्रतिबिंब आहे. स्वातंत्र्यापूर्वी 'फिअरलेस' १९१३-४७ एक स्त्री अन्यायाचा प्रतिकार करीत, गुडांना लोळवत या काळात रूपेरी पडदा गाजवत होती. टारझन, जेम्स, बॉड, रँबो यांनीही मान खाली घालावी असं तिच कर्तृत्व होतं. 'फिअरलेस नादिया.. पळत्या टांग्यात उडी मारणं, तलवारबाजी, भालाफेक, पळत्या रेल्वेतून उड्या मारणं असे तिचे अचाट कृत्य स्त्रीच्या नाजुकपणाच्या सर्व कविकल्पना या स्त्रीने तलवारीच्या एका फटक्यात उधळून लावल्या. त्या काळात अहिल्या उद्धार (१९१९) सारखे काही स्त्री प्रधान चित्रपटही बनले. मात्र स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभुमीवर तिचा दुर्गावतारच अधिक अधोरेखित झाला.

लेखन : सीमा कुलकर्णी

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎙️जागतिक महिला दिन भाषण

🎙️ राजमाता जिजाऊ माँसाहेब 

🎙️ राजमाता अहिल्याबाई होळकर

🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

🎙️ भारतरत्न इंदिरा गांधी

🎙️ डॉ. आनंदीबाई जोशी

🎙️ समाजसेविका रमाबाई रानडे

🎙️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर 

🎙️ धावपटू कविता राऊत

🎙️ फ्लाईंग राणी हिमा दास

🎙️ कल्पना चावला मराठी

🎙️ कल्पना चावला इंग्रजी

🔖 जागतिक महिला  दिन उपयुक्त भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन 

↪️  जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक

↪️  ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण

↪️  आधुनिक-स्त्रीची-रूपे-भाषण

↪️  महिला-सबलीकरण-भाषण

↪️  स्त्री-शक्तीला-सलाम-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-घोषवाक्ये

↪️  जागतिक-महिला-दिन-शायरी

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण

↪️  महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण

↪️  लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

أحدث أقدم