उपस्थित गुरुजनवर्ग व माझ्या प्रिय मित्रांनो! आपल्या सर्वांना माहीत आहे की, आज आपण सर्व येथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. या सुंदर प्रसंगी, आपल्या सर्व शिक्षकांना, ज्यांनी आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यात अतुलनीय योगदान दिले आहे, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस म्हणजेच शिक्षक दिन होय.
दरवर्षी ५ सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो. नेहमीप्रमाणे आजचा हा दिवस खूप उत्साह आणि आनंदाने भरलेला आहे. सर्वच विद्यार्थी आपल्या शिक्षकांना ते त्यांच्यासाठी कसे आणि का खास आहेत हे सांगण्यासाठी उत्सुक आहेत. प्रिय मित्रांनो, आज मी आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व या विषयावर दोन शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही विनंती!
भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे केवळ भारताचे राष्ट्रपतीच नव्हते तर ते एक महान विद्वान आणि शिक्षक देखील होते.
देशभरातील विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. शिक्षक हे आपल्या समाजाचा कणा आहेत. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात आणि त्यांना देशाचे आदर्श व संस्कारित नागरिक बनवण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे.
शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या आणि राष्ट्राच्या वाढीवर, विकासावर आणि कल्याणावर मोठा प्रभाव पडतो.
पालकांपेक्षा शिक्षक हे नेहमीच मोठे असतात. अशी एक म्हण आहे की, पालक मुलाला जन्म देतात तर शिक्षक त्या मुलाचे व्यक्तिमत्त्व घडवून त्याचे भविष्य उज्ज्वल करतात. अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी तसेच जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शिक्षक आपल्या पाठीशी कायम उभे असतात.
शिक्षक हे आपल्यासाठी सदैव ज्ञान आणि बुद्धीचे स्त्रोत आहेत. आमचे आयुष्य घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचे आम्ही सदैव ऋणी आहोत. या प्रसंगी मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो.
!! शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
भाषण निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.
सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
--------------------------------
👨🏻🏫 शिक्षक दिन मराठी सूत्रसंचालन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -परिचय
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हिंदी
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 4
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 5
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 6
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 7
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 8
👨🏻🏫 शिक्षक दिन कविता
👨🏻🏫 शिक्षक दिन शायरी
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 4
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/