सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित गुरुजनवर्ग व माझ्या विद्यार्थीमित्रांनो, आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेल्या तुम्हा सर्वांना मी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षक दिन हा एक विशेष आणि महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी विद्यार्थी शिक्षकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना वंदन करतात.
शिक्षक हेच खरे आयुष्यातील मार्गदर्शक असतात. शिक्षक विद्यार्थ्याला जबाबदार नागरिक बनवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. ते मार्गदर्शक म्हणून देखील काम करतात आणि विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय गाठण्यासाठी मदत करतात. त्यांचे योगदान केवळ शाळांपुरतेच मर्यादित नसून ते समाज आणि देशापर्यंत पोहोचले आहे. पालकांनंतर, शिक्षकांनाच समाजात आदर दिला जातो.
शिक्षक दिनाचा कार्यक्रम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना भेटवस्तू, फुले आणि ग्रीटिंग कार्ड्स देऊन हा कार्यक्रम साजरा करत असतात. कार्यक्रम अधिक रंजक आणि रंगतदार करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाते.
शिक्षक दिन विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी व शिक्षकांचे आभार मानण्याची एक संधी देत असतो. आपले आयुष्य घडवणाऱ्या शिक्षकांचा सतत आदर करूयात व त्यांचे आभार मानुयात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, धन्यवाद!
!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!
भाषण निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.
सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
--------------------------------
👨🏻🏫 शिक्षक दिन मराठी सूत्रसंचालन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -परिचय
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हिंदी
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 4
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 5
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 6
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 7
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 8
👨🏻🏫 शिक्षक दिन कविता
👨🏻🏫 शिक्षक दिन शायरी
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 4
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/